कोविड - 19 च्या काळात स्कुल बसला अॅम्ब्युलन्सचा दर्जा द्यावा
शिवसम्राट विद्यार्थी वाहतुक संघटनेची पालकमंत्री, जिल्हाधिकारी, महापौर, आयुक्तांकडे मागणी
शिवसम्राट विद्यार्थी वाहतुक संघटनेची पालकमंत्री, जिल्हाधिकारी, महापौर, आयुक्तांकडे मागणी
लातूर शहरातील कोरोना रूग्णांचे हाल मोठ्या प्रमाणात होत असून आरोग्य यंत्रणा कमजोर पडत आहे. अशा कोरोना काळात कोरोना रूग्णांना कोणीतरी आधार किंवा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यास तयार होत नसतांना अशा प्रसंगी लातूर शहरातील स्कुलबस चालक हे पुढे येवून अशा रूग्णांसाठी सेवा देवू इच्छित आहेत. या सेवेच्या माध्यमातून त्यांना महानगरपालिकेच्यावतीने रोजगार मिळावा या शुध्द हेतूने हि मागणी करण्यात येत आहे. आज गेल्या दोन वर्षापासून या स्कुलबस चालकांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांना कुठलाही व्यवसाय, उद्योग करता येत नसून त्यांच्यावर कठीण प्रसंग ओढावला आहे. त्यांचे संसार उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आहेत. तरी अशा कठीण प्रसंगी त्यांना धीर म्हणून महानगरपालिकेने कोवीड-19 काळात त्यांच्या स्कुलबसचा वापर अॅम्ब्युलन्स म्हणून करून घेवून त्यांना धीर देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांनी स्कुलबसला अॅम्ब्युलन्सचा दर्जा देवून त्या स्कुलबस चालकांच्या हाताला रोजगार देण्याचे काम केलेले आहे.
तरी शिवसम्राट विद्यार्थी वाहतुक सेनेच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी शिवसम्राटचे अध्यक्ष हनुमंत गोत्राळ व मराठवाडा संपर्क प्रमुख राजु माळी यांनी पालकमंत्री अमित देशमुख, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., महापौर विक्रांत गोजमगुंडे, आयुक्त अमन मित्तल यांच्याकडे केली आहे.
आपला
राजु माळी
मो. 9325620058
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.