कोवीड काळात वार्तांकन करणा-या पत्रकार बांधवांना कोरोना वाॅरियरसचा दर्जा द्या : धनंजय शिंदे
औसा प्रतिनिधी
कोवीड काळात वार्तांकन करणा-या पत्रकार बांधवांना कोरोना वाॅरियरस म्हणून मान्यता द्या अशी मागणी आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे सचीव धनंजय शिंदे यांनी दि.३ मे २०२१ सोमवार रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे.राज्यात कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती अत्यंत चांगल्या रितीने हाताळल्या बद्दल आपले व संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून अभिनंदन.कोरोना विरोधात लडाई लडणा-या सर्व डॉक्टर्स, परिचारीका, दवाखान्यातील कर्मचारी, पोलिस व शासनाच्या कर्मचाऱ्यांना खुप खुप धन्यवाद आम्हाला तुम्हा सर्वांचा खूप अभिमान आहे.
कोरोना विरुद्धच्या लढाईत संपूर्ण आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी आपल्या सोबत आहेत.आम आदमी पक्षाची राज्यातील सर्व यंत्रणा गावपातळीपासून शहरपातळी पर्यंत सरकारी यंत्रणेशी समन्वय साधून जनतेला मदत करत आहे.या लडाईत राज्यातील पत्रकारांचे योगदान खूप मोठे आहे.या भयावय परिस्थितीत तळहातावर शीर घेऊन पत्रकार व कॅमेरामन सत्य मांडायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. दुर्दैवाने आपले काम करताना राज्यातील अनेक पत्रकारांचा मृत्यू झाला आहे.अनेक पत्रकार औषधोपचार घेत आहेत.त्यांच्या घरच्यांना सुध्दा कोरोना झालेला आहे.आपण संवेदनशील आहात.पूरोगामी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही आपणास विनंती करतो की राज्यातील सर्व पत्रकारांना कोरोना वाॅरियरसचा दर्जा द्यावा.जेणेकरुन ही लडाई निर्भिडपणे लढून राज्याला लडाई जिंकण्यास मदत करतील.या मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना दिले आहे.या निवेदनावर आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सचीव धनंजय शिंदे यांची स्वाक्षरी आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.