७६ विलासवृक्ष लावून आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांना ७६ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
ग्रीन लातूर वृक्ष टीमचा उपक्रम
लोकनेते, लातूरचे भाग्यविधाता, लातूर वृक्षचे प्रणेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांची आज ७६ वी जयंती.
या ७६ व्या जयंतीनिमित्त विलासराव देशमुख समांतर रस्ता दुतर्फा ७६ मोठी झाडे - विलास वृक्ष लावण्यात आली.
सर्व झाडांना टँकरद्वारे पाणी देण्यात आले.
तत्पुर्वी स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वृक्षारोपण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी लातूर महानगरपालिकाचे उपायुक्त श्री शशीमोहन नंदा,
लातूर जिल्हा नियोजन समिती कार्यकारी सदस्य श्री समदजी पटेल
हे उपस्थित होते.
स्व. विलासरावजी देशमुखसाहेबांचे हरित लातूर चे स्वप्न ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून पूर्ण होत आहे याबद्दल श्री समद पटेल यांनी समाधान व्यक्त केले. लातूर महानगरपालिकाच्या वतीने ग्रीन लातूर वृक्ष टीमला सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन मनपा लातूर उपायुक्त शशीमोहन नंदा यांनी दिले.
यावेळी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, मनपा नगरसेवक इम्रानजी सय्यद, सुलेखा कारेपुरकर, गंगाधर पवार, प्रमोद निपाणीकर, मनमोहन डागा, डॉ. विमल डोळे, सार्थक शिंदे, प्रसाद श्रीमंगले, मोईझ मिर्झा, आशा अयाचित, प्रिया नाईक, युगा कनामे, खाजा पठाण, दयाराम सुडे, विक्रांत भूमकर, कृष्णा वंजारे, डॉ. अमृत पत्की, अरविंद फड, विजयकुमार कठारे, महेश गेलडा, कुंदन सरवदे, नागसेन कांबळे, नितीन पांचाळ, बोडके पांडुरंग, साहिल जाधव, शेख फारूक, तांबोळी असिफ, आदित्य फंड, वैजनाथ वानखेडे यांनी वृक्षारोपण करिता श्रमदान केले.
गेल्यावर्षी २६ मे २०२० रोजी राणी अहिल्याबाई होळकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथपर्यंत रस्ता दुतर्फा 220 मोठी झाडे विलास वृक्ष लावली होती, त्यापैकी 182 झाडे मोठी झाली आहेत, बहरत आहेत, अंबेजोगाई रोडची शोभा वाढवत आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.