राज्यात कोविडसाठी पर्यायी उपचार पद्धती राबविण्याबाबत चाचपणी करा - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

 

राज्यात कोविडसाठी पर्यायी उपचार पद्धती राबविण्याबाबत चाचपणी करा

 -  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख




मुंबईदि.  :

  दुसऱ्या लाटेत राज्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयुषच्या पर्यायी उपचारपद्धती राबविण्याबाबत चाचपणी करण्यात यावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिले.

 

अमित देशमुख यांच्या उपस्थितीत आज आयुष टास्कफोर्सच्या सदस्यांची ऑनलाइन बैठक झाली त्यावेळी श्री देशमुख बोलत होते वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की,  गेल्या जवळपास वर्षभरापासून अधिक काळ कोविड संकटाशी आपण सामना करत असून अजूनही रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाहीवाढत्या कोविड रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर्स कमी पडत आहेत हे लक्षात घेऊन या कामी राज्यात सध्या उपलब्ध असलेल्या अडीच लाख आयुष डॉक्टरांचा उपयोग चांगल्या पद्धतीने कसा करून घेता येईल याबाबत विचार करण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी केली.

 कोविड रुग्णांची संख्या  तातडीने कमी करणे आवश्यक आहेकोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्यांना आयुर्वेदहोमिओपॅथीयुनानी अशा पर्यायी उपचार पद्धती देता येऊ शकतातत्यासाठी आदर्श नियमावली (एस..पी).तयार करण्याचे काम आयुष संचालनायामार्फत तातडीने करण्यात यावे असेही देशमुख यांनी सूचित केले.

 कोविडची लागण होऊ नये यासाठी त्याचप्रमाणे कोविड बाधित रुग्णांसाठीही प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या अनेक औषधांना केंद्रीय आयुष मंत्रालयाने मान्यता दिली आहे तसेच अशा प्रकारची अनेक चांगली औषधे मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत ही औषधे लवकरात लवकर कशी उपलब्ध करून देता येतील याबाबतही प्रयत्न करण्याचे यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.

 सध्या दिल्ली आणि जयपूरमध्ये कोविडसाठी आयुर्वेद उपचाराला मान्यता देण्यात आली असल्याने हाच पॅटर्न महाराष्ट्रातही राबविण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करण्यात येईलयामुळे आयुष डॉक्टरांचे मोठे संख्याबळ उपलब्ध होणार आहेआयुष अंतर्गत येणाऱ्या पॅथीना उपचारांसाठी परवानगी द्यावी असे केंद्र शासनाकडे पत्र आयुष संचालनायामार्फत देण्यात येईलअसेही श्री देशमुख यांनी सांगितले.

श्री देशमुख म्हणाले कीकोविडसाठी उपचार पद्धती निरनिराळ्या असून ऍलोपॅथी यामध्ये प्रमुख भूमिका निभावत असली तरी अल्टरनेटीव्ह थेरपी निरनिराळ्याअसू शकतातआयुष संचालनायांतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या पॅथीच्या डॉक्टरांनी या क्षेत्रात चांगले काम आणि संशोधन केलेले आहेत्यामुळे आपल्या  संशोधनाच्या कामाचाज्ञानाचा उपयोग या काळात करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेयेत्या काळात होमिओपॅथिक आयुर्वेदिकऔषधे यांना मान्यता देताना त्यांनी मानके परिपूर्ण केली आहेत का हे तपासून घेणे आवश्यक आहे.

आजच्या या बैठकीस वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ तात्याराव लहानेआयुष संचालक डॉ कुलदीप राज कोहली,डॉ झुबैर शेखडॉ मनीष पाटीलडॉ जवाहर शाहडॉ शुभा राऊळडॉ.उर्मिला पिटकर,डॉ उदय कुलकर्णीडॉ मनोज राजाडॉ जसवंत पाटीलडॉ राजश्री कटकेडॉ संजय लोंढेडॉ अमित दवेडॉ राजेंद्र निरगुडे, , डॉ.नवीन पावस्करडॉ पुरुषोत्तम लोहियाडॉ.हरीश बी सिंग,जयंत वकनाली आदी उपस्थित होते.

       ----------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या