कॉग्रेस पक्ष व विविध सेलच्या पदाधिकारी यांनी
कोवीड१९ प्रादूर्भाव काळात प्रशासना सोबत राहून जनतेला सहकार्य करावे
महाविकास आघाडी सरकारच्या लॉकडाऊन काळातील योजना
जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी पूढाकार घ्यावा
पालकमंत्री मंत्री अमित विलासराव देशमुख
लातूर प्रतिनिधी : ४ मे :
कोवीड१९ प्रादूर्भाव काळात रूग्णसंख्या वाढत आहे, या काळात प्रशासना सोबत राहून कठीण प्रसंगी कॉग्रेस पक्ष व विविध सेलच्या पदाधिकारी यांनी जनतेला सहकार्य करावे. लॉकडाऊन काळात सामान्य माणसांना अडचणी येऊ नयेत त्यांना मदत व्हावी याकरीता महाविकास आघाडी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी पूढाकार घ्यावा, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
मंगळवार दि. ४ मे २१ रोजी दुपारी दुरदृश्य माध्यमाव्दारे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत आढावा बैठक घेतली. या वेळी बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख म्हणाले की, १८ वर्षावरील विद्यार्थ्यासह शाळा व महाविद्यालयातील शिक्षक व प्राध्यपकांचे लसीकरण करून घेण्यात यावे. जेणेकरून शैक्षणिकक्षेत्र पूर्ववत सुरु करण्याचा प्रयत्न करता येईल, प्रत्येक प्रभागातून महिला सक्षम करण्याच्या दृष्टीने महिलांना एकत्रित करून त्यांच्यासाठी योजना राबवाव्यात, शहरातील सर्वच महिला भगिनी करीता शहर बस प्रवास मोफत सुरु करावा, आपत्तीच्या काळात सामान्यांना मदतीचा हात देणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या सहकार्यातून आवश्यक त्या ठिकाणी व्हेटीलेटर, आरोग्य सेवा देणारी यंत्र सामुग्री संकलन करून त्याचा फायदा रुग्णांना व आरोग्य यंत्रणेला कसा करून देता येईल यावर लक्ष केंद्रित करावे, रक्ताचा तुटवडा लक्षात घेता लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त २६ मे रोजी पक्षाच्या वतीने शहर व जिल्हाभरात रक्तदान शिबीराचे आयोजन करावे, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोविड १९ काळात महाविकास आघाडी सरकारने गरजूसाठी जाहीर केलेल्या शासकीय योजना, आरोग्य सेवा सुविधा बाबत लागणारी आवश्यक ती मदत उपलब्ध व्हावी यासाठी पुढाकार घेऊन प्रशासना सोबत कार्यरत राहावे, ऑटोरिक्षा चालक तसेच बांधकाम मजूर यांच्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ मिळत आहे की नाही याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यावेळी केल्या.
प्रारंभी या बैठकीत मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे, मनपा विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळ, लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल उटगे, फारूख शेख, स्मिता खानापुरे, मोहन सुरवसे, सचिन गंगावणे, सुपर्ण जगताप, नेताजी बादाडे, प्रविण सुर्यवंशी यांनी कोवीड१९ व काँग्रेस पक्षसंघटनेच्या कामकाजा संदर्भात सुचना मांडल्या. काँग्रेस पक्षाच्या वतीने लातूर शहरासह जिल्ह्यात कोविड१९ प्रादुर्भाव काळात रुग्णांना मिळणाऱ्या आवश्यक आरोग्य सेवा सुविधा बाबत माहिती घेऊन त्यांच्या आडचणी दूर करण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्यासाठी पालकमंत्री दूत संकल्पना राबविली जावी अशी सूचना या बैठकीत एन.एस.यु.आय.चे अध्यक्ष शरद देशमुख यांनी यावेळी केली. लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात लसीकरण नाव नोंदणी केंद्र पक्षाकडून सुरु केले जावे, जेणेकरून लसीकरण करीता होणारी सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय दूर होईल, तसेच कोविड १९ प्रादुर्भाव काळात रुग्णांवर करण्यात आलेल्या उपचारासह त्याला आरोग्य, मनपा, जिल्हा प्रशासनाकडून मिळालेले सहकार्य आणि सदर रुग्णाने या महामारीवर केलेली मात या बाबतचे सकारात्मक व्हिडीओ चित्रण क्लिप समाज माध्यमातून प्रसारीत व्हावेत जेणेकरून नागरिकामध्ये असलेले गैरसमज व रोगाविषयी असलेली भीती दूर होण्यास मदत होईल अशी सूचना शहर अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी केली.
दूरदृश्य माध्यमातून यावेळी बैठकीस मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे, मनपा विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळ, लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव, महिला काँग्रेस अध्यक्ष स्मिता खानापुरे, सेवादल अध्यक्ष सुपर्ण जगताप, फारूख शेख, युवक काँग्रेस अध्यक्ष मोहन सुरवसे, एनएसयुआय अध्यक्ष शरद देशमुख, सचिन गंगावणे, नेताजी बादाडे, प्रविण सुर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.