लक्षद्वीप मध्ये नेमक घडतय काय..?

 लक्षद्वीप मध्ये नेमक घडतय काय..?


लक्षद्वीप.

अवघ 32किमी. क्षेत्रफळ आणि लोकसंख्या 65,000 च्या घरात.

95%मुस्लिम समाज आणि राहिलेला 5% इतर.थोडक्यात मुस्लिम बहुल.





या लक्षद्वीप वर गेल्या काही दिवसात वाईट गोष्टी घडताहेत.बहुदा या घडणाऱ्या गोष्टींना भविष्यात मुस्लिम समाजाच्या विरोधात वाईट पद्धतीने देशभर वापरल्या जाऊ शकतात.आणि या गोष्टींवर काही सामजिक कार्यकर्ते सोडले तर इतर कोणीच बोलायला तयार नाहीत.


काही दिवसापूर्वी लक्षद्वीप चे राज्यपाल दिनेश्वर शर्मा यांचं निधन झालं.यानंतर मोदी सरकारने या जागेवर शेठजींच्या खास माणसाला म्हणजेच प्रफुल पटेल यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती केली.हे तेच प्रफुल पटेल आहेत ज्याचं नाव आता काही दिवसापूर्वी दादर नगर हवेली चे खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाइड नोट मध्ये आले होते.मोहन डेलकर यांनी याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबई येथे गळफास घेवुन आत्महत्या केली होती.


खासदार डेलकर यांना आत्महत्या करावी लागली कारण,राज्यपाल प्रफुल पटेल यांनी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून तब्बल 25 कोटी रुपयांची रक्कम, देलकर यांच्याकडे मागितली होती,अशी माहिती त्यांचे चिरंजीव अभिनव डेलकर यांनी सांगितले होते.

परंतु मोदी सरकारने यावर काहीच कारवाई न करता,चौकशी न करता प्रफुल पटेल यांना लक्षद्वीपच्या राज्यपाल पदी नियुक्त केले होते.


राज्यपाल पदी नियुक्ती झाल्यानंतर प्रफुल पटेल यांनी,आपले राजकीय रंग दाखवायला सूरवात केली.आणि लक्षद्वीप च्या शांततेला,एकात्मतेला तडे जाऊ लागले.


Covid सोबत लढताना पूर्व राज्यपाल दीनेश्वर शर्मा यांनी लागू केलेलं जवळपास सगळे नियम या महाशयांनी धुडकावून लावले आणि प्रदेशात सामान्य स्थिती असल्याप्रमाणे,नियम त्यांनी लागू केले.


वर सांगितल्या प्रमाणे मुस्लिमांची लोकसंख्या या प्रदेशात 95% आहे.परिणामी त्यांच्या आहारात मासाहारी पदार्थांचा प्रामुख्याने समावेश असतो.या मासाहारी पदार्थांना या महाशयांनी शाळेच्या कॅन्टीन मधून काढून टाकले आणि फक्त शाकाहारी जेवणच मिळेल,असा फतवा काढला.


त्यानंतर त्यांच्या प्रशासनाने लक्षद्वीपच्या मासेमारी समुदायाला मदत करण्यासाठी स्थापन केलेल्या अनेक शेड व स्थानिक संस्था नष्ट केल्या.या संस्था स्थानिक मासेमारी करणाऱ्या समुदायाच्या हितासाठी बांधण्यात आल्या होत्या.कित्येक वर्ष त्या तिथे उभ्या होत्या.बर हे करत असताना या महोदयांनी संबंधित जनतेला,याच कारण देणे देखील गरजेचे समजले नाही.


पुढचं पाऊल म्हणून प्रफुल पटेल यांनी,लक्षद्वीप मध्ये रस्ते मोठे करण्याचा कार्यक्रम सुरू केला.स्थानिकांनी याला मोठा विरोध केला.कारण लक्षद्वीपमध्ये वाहनांची संख्या जास्ती नाही आहे.65 हजार लोकसंख्या असणाऱ्या प्रदेशात अशी असून असून किती वाहन असणार आहेत..? परंतु,राज्यपाल महोदयांनी जनतेच्या विरोधाला काडीचीही किंमत न देता आपल काम सुरू ठेवल आहे.


हे पुरेसे नव्हते, तर  राज्यपाल आणि प्रशासनाने आरोग्य, कृषी आणि शिक्षण यासह अनेक सरकारी संस्थांमधील बर्‍याच कर्मचार्‍यांना कोणतीही पूर्वसूचना न देता विनाकारण बडतर्फ केले आहे.


लक्षद्वीप मध्ये गुन्हेगारी खूप कमी प्रमाणात आहे.इथला गुन्हेगारी दर ना च्या बरोबर आहे.तरीदेखील प्रफुल पटेल यांनी,लक्षद्वीप मध्ये, "गुंडा ॲक्ट",आणायचा घाट घातला आहे.कारण ते हे काही प्रकार तिकडे करत आहेत,त्याला स्थानिक जनतेचा मोठ्या प्रमाणात विरोध होतोय.आणि हा ॲक्ट लागू करून ते,त्यांना विरोध करणाऱ्याजनतेचा आवाज दाबू इच्छित आहेत. 


 थोडक्यात,

Covid च्या आधी असणाऱ्या नियमात स्थानिक जनता खुश होती.

गेली पाच पन्नास वर्ष शाळेच्या कॅन्टीन मध्ये मिळणाऱ्या मासाहारी पदार्थांवर स्थानिक जनतेने आक्षेप घेतला नव्हता.त्यांच्यासाठी आधीच्या सरकारने बांधलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर मासे साठवणुकीसाठी वापरण्यात येणारे शेड्स पाडाव्यात,अशी देखील स्थानिकांची मागणी नव्हती.

वाहने कमी असल्या करणारे असणाऱ्या रस्त्यांवर स्थानिक मंडळी समाधानी होती.किंवा परिसरात गुन्हेगारी वाढली असल्याची देखील त्यांची तक्रार नव्हती.


आता प्रश्न उरतो की राज्यपाल प्रफुल पटेल हे सगळ का करत आहेत..? 


वरील सर्व बाबींचा विचार केला तर एकच गोष्ट जास्ती शक्यतेची वाटते.लक्षद्वीप मध्ये असणारा बहुसंख्य मुस्लिम समाज.लक्षद्वीपला प्रयोगशाळा बनवण्याचे प्रयत्न तर सुरू नाहीयेत मोदी सरकारचे..? मोदी सरकारचा मुस्लिम समाजाबद्दल असणारा आकस तर आपण जाणतोच.आणि या आकसेपाई देशाच्या एका कोपऱ्यात,स्थानिक पातळीवर बहुसंख्य मुस्लिम समाजाला भविष्यातील योजनांच्या दृष्टीने,गिनिपिग म्हणून वापरत तर नसतील..? 


आज संध्याकाळी,ट्विट का #savelakshwdeep हा ट्रेंड होतोय.मराठी कळणाऱ्या आणि इथ बसून साडे चार हजार किमिवरील पॅलेस्टाईन साठी #standwithpalestine हा ट्रेंड चालवणाऱ्या मुस्लिम बांधवांना एक विनंती आहे,"बांधवांनो,पॅलेस्टाईन सोबत उभ राहून झाल असेल तर,आता आपल्याच देशातील लक्षद्वीप मधील बांधवांच्या साठी देखील आवाज बुलंद करा.

आपल्याला खासकरून हे सांगावे लागते आहे,कारण आपल्या आधी शेकडो हिंदू बांधव लक्षद्वीप साठी उभे ठाकले आहे.त्यासाठी आवाज उठवत आहेत..!किंबहुना त्यांच्यामुळेच हा विषय देशाला आणि जगाला कळतो आहे...आता जबाबदारी तुमची देखील आहे..!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या