*इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे जमियत उलमा-ए-हिंद,सोलापूर संस्थेस आँक्सिजन काँन्सनट्रेट मशिन भेट...*
सोलापूर-26-5-2021 सामाजिक,आरोग्य,शैक्षणिक कार्य करणाऱ्या इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे जमियत उलमा हिंद,सोलापूरला आज दोन आँक्सिजन काँन्सट्रेटर देणगी म्हणून देण्यात आले.पाच आँक्सिजन काँन्सट्रेटर मंजूर करण्यात आले असून लवकरच सोलापूरात पोहोचल्यानंतर देण्यात येईल असे सोलापूरचे संयोजक उमर फाउंडेशनचे नियामत पटेल यांनी सांगितले.तसेच व्हेंटीलेटर मशिनची मागणी केली असून लवकरच ते मशिनही देण्याचे आश्वासन आय.डी.एफ.चे व्यवस्थापक डाँ.नारायण अय्यर यांनी जमियतला दिले आहे..
जमियात-उलमा-ए हिंदचे अध्यक्ष मौलाना ईब्राहिम कासमी यांनी डॉ.नारायण अय्यर व इंडियन डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे. सदर मशीन कोविडग्रस्त गरजू रुग्णांना कुठलेही चार्ज न करता मोफत देण्यात येतील असे यावेळी त्यांनी सांगितले.यावेळी जमियत उलमा-ए-हिंदचे मौलाना हारिस इशाअती,हाजी अय्यूबभाई मंगलगीरी,हाजी मैनोद्दीन शेख,हसीब नदाफ,अ.रशिद आळंदकर,हाफिज चाँदा,हाफिज युसुफ,हाजी सत्तारभाई दर्जी,मुश्ताक ईनामदार युनुस डोणगावकर म.युसुफ प्यारे,अ.मजीद गढवाल आदि उपस्थित होते.
----------------------------------
हसीब नदाफ
जिल्हा जनरल सेक्रेटरी
जमियत उलमा-ए-हिंद
सोलापूर
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.