पाशा पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त...
बांबू शेतीवर वेबिनार
इंडियन बांबू फोरमचा उपक्रम
लातूर/प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि.५ मे रोजी 'बांबू शेती' या विषयावर खास वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू अध्यक्ष असलेल्या इंडियन बांबू फोरमच्या वतीने हे वेबिनार घेतले जात असून केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला हे प्रमुख अतिथी म्हणून यात सहभागी होणार आहेत.
बुधवारी सायंकाळी ४ ते ६ या कालावधीत हे चर्चासत्र होणार आहे.बीजिंग येथे मुख्यालय असणाऱ्या इनबार या संस्थेचे इथिओपिया येथील प्रोजेक्ट मॅनेजर डॉ.सलीम रजा,डेहराडून येथील जेनेटिक्स अँड ट्री इम्प्रूव्हमेंट फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. अजय ठाकूर,सिंधुदुर्ग येथील कॉनबॅक या संस्थेचे निर्देशक संजीव करपे,मुंबई विश्व विद्यालयाचे माजी कुलपती डॉ.संजय देशमुख आणि पाशा पटेल या वेबिनार मध्ये सहभागी होणार आहेत.
बांबू शेतीचे फायदे शेतकऱ्यांना लक्षात यावेत तसेच बांबू शेती हे जनआंदोलन बनावे या उद्देशाने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.ज्या शेतकऱ्यांना यात सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी https://indiabambooforum.com या लिंकवर क्लिक करून आपला सहभाग नोंदवावा,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट....
बांबू आणि ऑक्सिजन... बांबू हे झाड २४तास ऑक्सिजन देते.एका व्यक्तीला वर्षाकाठी २८० किलो ऑक्सिजन लागतो तर बांबूचे झाड ३२० किलो ऑक्सिजन देते.
वातावरणातील ३० टक्के कार्बन हे झाड खाते.
कोरोनामुळे ऑक्सिजनची टंचाई निर्माण झालेली आहे. भविष्यातही अशी टंचाई निर्माण होऊ शकते.अशा स्थितीत बांबू शेती अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडू शकते.त्यादृष्टीने हे वेबिनार अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.