औसा येथे तिसऱ्या शिवभोजन केंद्राचा शुभारंभ

 औसा येथे तिसऱ्या शिवभोजन केंद्राचा शुभारंभ







 औसा प्रतिनिधी


 कोरोना विषाणूंच्या संकट काळात सर्वसामान्य नागरिकांना शिवभोजन हा केंद्राचा मोठा आधार आहे महाविकास आघाडीच्या वतीने दहा रुपयात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.औसा शहरातील तिसऱ्या शिवभोजन केंद्राचा शुभारंभ मंगळवार दिनांक 4 मे 2021 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक राजेंद्र भोसले यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत औसा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सकाळी 11 वाजता संपन्न झाला. मागील वर्षी राज्य सरकारने कोरोना च्या संकटामुळे पाच रुपयात शिवभोजन दिले होते.परंतु या वर्षी कोरोणाचे भीषण संकट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरजूंना मोफत शिवभोजन थाळी देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.

    पूर्वी दोन केंद्रावर प्रत्येकी 75 थाळी तर आज शुभारंभ झालेल्या केंद्रावर 100 शिवभोजन थाळी देण्यात येणार असून तालुक्यातील 250 गरजूंना दररोज शिवभोजन मोफत मिळणार आहे. या वेळी बाजार समितीचे उपमुख्य प्रशासक किशोर भोसले व्यंकट पन्हाळे बाजार समितीचे सचिव मुस्ताक शेख सहाय्यक निबंधक अमोल वाघमारे योगीराज पाटील मनोज सोमवंशी नामदेव माने प्रवीण कोहाळे दिलीप लवटे दत्तात्रेय कोळपे संगमेश्वर उटगे वलीखान पठाण, निलेश आजचे, सदाशिव काळे संतोष हुचे भुजंग सोमवंशी रामभाऊ शिंदे शिवभोजन केंद्राचे संचालक रमाकांत माळी ,विजयकुमार माळी ,राहुल माळी नवनाथ भोसले, चांगदेव माळी, सुधाकर माळी आदींची उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या