मातोळा सरपंचकडून निराधार अनुदान घरपोच वाटप;लाभार्थ्यांनी केले समाधान व्यक्त

 मातोळा सरपंचकडून निराधार अनुदान घरपोच वाटप;लाभार्थ्यांनी केले समाधान व्यक्त





औसाप्रतिनिधी-औसा तालुक्यातील मातोळा येथील सरपंच यांनी कोरोनाच्या संकटामुळे बँकेला गर्दी होऊ नये आणि कोणाला गर्दीमुळे कोरोना विषाणूची लागण होऊ नये यासाठी म्हणून त्यांनी घरपोच अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेऊन स्वतः घरी जाऊन वाटप करीत आहेत.

औसा तालुक्यातील मारतळा सरपंच बालाजी सूर्यवंशी यांनी गावातील निराधार योजनेतील लाभार्थी संख्या चारशे असून सर्व लाभार्थ्यांना घरपोच अनुदान वाटप करण्यासाठी कोरूना परिस्थितीमध्ये ते स्वतः सामाजिक कार्य करीत आहेत.

यामुळे गावातील प्रत्येक लाभार्थ्याचे बँक पासबुक आणि स्लिप घेऊन ते स्वतः बँकेमध्ये जातात आणि दैनंदिन शंभर नागरिकांचे अनुदान घरी जाऊन स्वतः वाटप करतात यामुळे सरपंच बालाजी सूर्यवंशी यांच्या कार्याबद्दल गावामध्ये नागरिकाकडून कोरोणाच्या महामारीच्या आणि संकटाच्या वेळी नागरिकांना हाताला काम नाही अनेक ठिकाणी उपासमार होत आहे.अशी विचित्र परिस्थिती गावावर येऊ नये आणि गाव आपले सुरक्षित राहावे यासाठी खरी सामाजिक सेवा ही रंजल्या-गांजल्या मध्येच आहे!सरपंचानी हे जाणून त्यांनी हा सामाजिक उपक्रम स्वतःला हाती घेल्याने औसा तालुक्यामध्ये सर्वत्र बालाजी सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या