सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - संभाजी ब्रिगेडची जिल्हा शल्यचिकित्सकांडे मागणी

 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - संभाजी ब्रिगेडची जिल्हा शल्यचिकित्सकांडे मागणी






निलंगा ( तालुका प्रतिनिधी)


 कोरोना रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत असलेले डॉक्टर दिनकर पाटील  यांच्यावर  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सकांडे निवेदनाद्वारे करण्यात आली

 उपजिल्हा रुग्णालय, निलंगा येथे मागील कालावधीत कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी यांच्या  गलथान कारभारामुळे व बेजबाबदारपणामुळे व रुग्णांची केलेली अडवणूक, पिळवणूक व छळवणूक तसेच शासकीय रुग्णालयात औषधी उपलब्ध असताना देखील विशिष्ट एकाच महाजन मेडिकल मधून महागडी औषधे आणण्यास सांगून वरून रुग्णांना 'तू जिवंत राहत नाहीस', 'तू मरतोस', 'तुला कोणीही वाचवू शकत नाही' अशा प्रकारची भीती निर्माण करून व रेमीडेसीवीरचा साठा उपलब्ध असताना देखील  त्याचा काळाबाजार करून अनेक रुग्णांचे जीवितास कारणीभूत असणाऱ्या या डॉक्टर ची चौकशी करून शासकीय रुग्णालयांमधील औषधांचा साठा व महाजन मेडिकल मधून 215 रुग्णांना स्वाक्षरीत दिलेल्या प्रिस्क्रिप्शन वरून या औषधाचा वापर कोठे व कसा झाला याची माहिती मिळणे आवश्यक आहे.




 डॉक्टर दिनकर पाटील यांची ही कृती निंदनीय असून आरोग्य खात्याला काळीमा फासणारी असून यंत्रणेवरचा विश्वास उडवणारी आहे या प्रकाराची सखोल चौकशी करून माननीय तहसीलदार गणेश जाधव यांनी दिलेला अहवाल न्यायिक असतानाही डॉक्टर दिनकर पाटील यांनी काही व्यक्तींना हाताशी धरून व आर्थिक व्यवहार करून या प्रकरणाला जातीयतेचा रंग देऊन निलंगा तालुक्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा जाणून बुजून प्रयत्न केलेला आहे तरी या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून न्याय द्यावा अन्यथा मयत रुग्णांच्या 69 नातेवाईकांसह उपोषणाला बसण्यात येईल याची दखल घ्यावी ही विनंती.या आशयाचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक देशमुख यांना देण्यात आले या निवेदनावर संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रमोद कदम,परमेश्वर नांगरे पाटील ता. संघटक, परमेश्वर बोधले सहसचिव, इरशाद शेख ता. उपाध्यक्ष, बीबीशन चव्हाण, मसूद हासमि आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या