स्मार्टग्राम योजनेत रामेश्वर जिल्ह्यात प्रथम चाळीस लाख रुपयाचा सन्मान
लातूर (प्रतिनिधी)
ग्रामविकास विभागाच्या वतीने आयोजित आर.आर.पाटील सुंदर गाव स्मार्ट ग्राम योजनेत रामेश्वर (रुई) ग्रामपंचायतीने जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
राज्य शासनाच्या वतीने आदर्श ग्राम योजनेचे रूपांतर आर.आर.पाटील सुंदर गाव म्हणजे स्मार्ट ग्राम योजनेत करण्यात आले आहे.यामध्ये करजगाव ,ताडमुगळी,जोगाळ,हंचनाळ,गंगापूर,ढोरसांगवी,वळसंगी,जढाळा,चाडगाव व रामेश्वर या गावांनी सहभागी घेऊन तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला होता.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिनव गोयल यांच्या नेतृत्वाखाली मुख्य लेखा व वित्त आधिकारी रत्नाकर जवळगेकर,उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पं) उदयसिंह साळुंखे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .गंगाधर परगे,जिल्हा कृषी विकास अधिकारी चोले ,कार्यकारी अभियंता बांधकाम गंगथडे,कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा शेल्हार यांच्या निवड समितीने जिल्ह्यातील या सर्व गावांची पाहणी करून या स्पर्धेचा निकाल जाहीर केला.यामध्ये रामेश्वर जिल्ह्यात प्रथम आले आहे. चाळीस लाख रूपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.रामेश्वर या गावाने विकासाबरोबरच रचनात्मक कामे उभारली असून ग्रामविकासाचे अनोखे माडेल उभा केले आहे.तुळशीरामअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सौ.सुदामती कराड,उपसरपंच कमाल पटेल ग्रामविकास अधिकारी शंकर भोसले यांनी सुक्ष्म नियोजन करून हा बहुमान मिळविला आहे.त्यांच्या या यशाबद्दल आ.रमेशअप्पा कराड,जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे ,उपाध्यक्ष सौ.भारतबाई साळुंके, उपमुख्यकार्यकारी अधिकारी उदयसिंह साळुंखे ,गटविकास अधिकारी शाम गोडभरले यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.