*ई-पास बनवून देतो असे बोलून पैसे लाटणाऱ्या ठगाला पुणे येथून अटक, लातूर सायबर सेल ची कारवाई.*
लातूर प्रतिनिधी
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 05/05/2021 रोजी एक इसम पोलीस ठाणे सायबर येथे आला व त्याने सांगितले की, त्याचे अत्यावश्यक वैयक्तिक कामामुळे त्यास लातूर वरून पुणे येथे जाणे असल्याने ईपास मिळवण्यासाठी अर्ज केला असून आतापर्यंत तो मिळालेला नाही. म्हणून ईपास ची माहिती मिळवण्या करिता ते प्रथम पोलीस स्टेशन शिवाजी नगर येथे गेले होते. तेथे सदर इसमास सविस्तर माहितीसाठी सायबर सेल येथे जाण्यास सांगितले. तेव्हा ते इसम सायबर सेल येथे आले व त्यांनी सांगितले की, मी ई-पास मिळवण्यासाठी सोशल मीडियाच्या पोस्ट वर आलेल्या एका मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून ट्रॅव्हल ई-पास बाबत विचारणा केली असता त्या मोबाईल क्रमांका वरील अज्ञात इसमाने ई-पास मिळून देण्याचे कबूल केले. व त्यासाठी 2000/- रुपये फीस असल्याचे सांगून ई-पास साठी फक्त आधार कार्ड व फिटनेस सर्टिफिकेट लागेल असे सांगून स्वतः फॉर्म भरून मंजूर करणार असल्याची हमी दिली.त्यामुळे नमूद अज्ञात इसमावर विश्वास ठेवून मी ऑनलाइन पद्धतीने फोन पे वरून अज्ञात इसमाच्या अकाउंटवर पैसे पाठविले परंतु पैसे देऊन ही ई-पास मंजूर न झाल्याने अधिक विचारपूस करण्यासाठी सायबर सेल येथे आलो आहे असे सांगितले.
Covid-19 च्या अनुषंगाने अत्यावश्यक कारणाशिवाय विनाकारण प्रवास करणारे लोकांवर आळा घालण्याकरीता शासनाने चालू केलेल्या ई-पास करिता कसल्याही प्रकारची फी आकारली जात नाही. तरीपण कोणीतरी अज्ञात व्यक्ती ई-पास मंजूर करून देतो म्हणून पैशाची लूट करत असल्याचे लक्षात आल्याने सायबर सेल,लातूर येथे नेमणुकीस असलेले पोलीस अमलदार रियाज अयुबसाब सौदागर यांचे फिर्याद वरून अज्ञात इसमा विरुद्ध पोलीस ठाणे शिवाजी नगर, लातूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 182/2021 कलम 420 भादवि व 66(c) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
फसवणूक झालेल्या इसमाकडून मिळालेल्या माहितीचा तांत्रिक विश्लेषण करून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनात अज्ञात इसमाचा शोध घेण्याकरिता सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सुरज गायकवाड, पोलीस अमलदार संतोष देवडे, रियाज सौदागर, रवी गोंदकर ,यशपाल कांबळे यांचे पथक तयार करून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पथकास लागलीच पुणे येथे रवाना करण्यात आले. सदर पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीस काळेवाडी फाटा, पिंपरी चिंचवड, पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव अनमोल पाटील राहणार- लातूर हल्ली मुक्काम काळेवाडी फाटा,पिंपरी चिंचवड, पुणे येथे असल्याचे सांगून लोकांकडून पैसे घेऊन ट्रॅव्हलिंग ई-पास देत असल्याचे मान्य केले त्यावरून नमूद आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस ठाणे शिवाजी नगर येथे दाखल गुन्ह्याच्या अधिक तपास कामी पोलीस ठाणे शिवाजीनगर यांचे ताब्यात देण्यात आले. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री. सुनीलकुमार पुजारी हे करीत आहेत.
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून आवाहन करण्यात येते की, ट्रॅव्हल ई-पास ही शासनाकडून अत्यावश्यक प्रवासाकरीता देण्यात येणारी निशुल्क सेवा असून त्यासाठी कसल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाहीत. त्यामुळे जनतेने कसल्याही प्रकारच्या अफवावर किंवा फसव्या जाहिरातीवर विश्वास न ठेवता रीतसर प्रक्रियेचा अवलंब करावा.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.