संभाजी ब्रिगेडचे विविध मागण्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,धनंजय मुंडे यांना निवेदन

 संभाजी ब्रिगेडचे विविध मागण्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,धनंजय मुंडे यांना निवेदन






निलंगा(प्रतिनिधी):-राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज निलंगा दौऱ्यावर आले असता संभाजी ब्रिगेड निलंगा शाखेच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले .

यात प्रमुख मागण्या मध्ये ,आगामी पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणचा ओबीसीत समावेश करून मराठा आरक्षण देण्यात यावे,ओबीसी आरक्षणाची टक्केवारी केंद्र सरकार कडून वाढऊन घावी,

ओबीसीची जातीनिहाय जनगणना करून लोकसंख्या नुसार आरक्षण देण्यात यावे,

मुस्लिम. लिंगायत. धनगर समाजाच्या आरक्षण संदर्भात तातडीने कार्यवाही करावी. अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले या निवेदनात शेवटी ही मागण्या मान्य नाही झाल्यास 

 संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर लोकप्रतिनिधींच्या विरोधात तिव्र आंदोलन करणारअसा इशारा ही देण्यात आला आहे या निवेदनात संभाजी ब्रिगेडचें तालुकाध्यक्ष प्रमोद कदम ,इरशाद शेख, भरत चव्हाण ,पेरमेश्वर बोधले,उस्मान शेख, कुणाल पाटील, मयूर बिराजदार,रामदास सोमवंशी, इरफान शेख इत्यादी पदाधिकारी यांच्या साक्षरी आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या