मासेमारीच्या परवान्यासाठी बेमुदत उपोषण*

 *मासेमारीच्या परवान्यासाठी बेमुदत उपोषण*





दि 25. तेर येथील तेरणा तलावात  येथील ग्रामस्थांना मासेमारी करण्यास परवाना देण्यात यावा यासाठी तेर येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही.

उपोषणकर्ते म्हणाले, तेर येथील 11 पेक्षा जास्त ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय मासेमारी आहे. यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मत्स्य व्यवसाय सं. संस्था मर्यादीत, गोवर्धनवाडी व तेरणा मत्स्य व्यवसाय सं संस्था मर्यादीत काळेवाडी, गोवर्धनवाडी या दोन संस्थेला शासनाने तलाव दिला होता. या दोन्ही संस्थेचे चेअरमन बाहेरगावी राहत असल्याने संस्थेचा कारभार नातेवाईक चालवत आहेत. या दोन्ही संस्थांच्या सचिवाकडे परवान्यासाठी अर्ज केला असता, दोन्ही संस्था अर्ज घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. असे असताना दोन्ही संस्थेच्या नातेवाईकांनी चोरून मासेमारी करतात असे खोटे आरोप आणि गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांचेकडे वारंवार अर्ज करण्यात आले, परंतु आमच्या अर्जाची दखल घेतली जात नाही.

त्यामुळे आम्ही उपोषणास बसले आहोत. या मागण्याचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. निवेदनावर बालाजी माने, सचिन माने, अविनाश माने, बालाजी शिंदे, खंडू जामकर आदींची नावे आहेत


 आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170

Web :www.laturreporter.in

रिपोर्टर *सय्यद महेबूबअली*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या