औसा येथे आणीबाणी सत्याग्रहींना सन्मानित केले.
सामाजिक न्याय दिनी ई स्वतंत्रता सेनानी चा सन्मान
औसा मुख्तार मणियार
दिनांक 25 जुन 1975 रोजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादून स्वतंत्र भारतातील जनतेला गुलामगिरीत लोटले होते. रात्रीतून अनेकांची धरपकड करून क्रूरपणे हजारो कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबले. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली देशभर सत्याग्रह सुरू झाले. या काळात अनेकांना आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून तुरुंगात जावे लागले. मनामध्ये देशभक्ती ठेवून जबरदस्तीने देशावर लागलेली गुलामगिरी घालवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभर सत्याग्रह पुकारला होता. अशा सत्याग्रह मध्ये योगदान देणाऱ्या औसा तालुक्यातील स्वतंत्रता सेनानीचा सन्मान लोकराजा राजषी शाहू महाराज यांची जयंती व सामाजिक न्याय या दिनाचे औचित्य साधून दिनांक 26 जून रोजी सकाळी 11 वाजता विजय मंगल कार्यालय येथे करण्यात आला. याप्रसंगी आमदार अभिमन्यु पवार यांच्या हस्ते राजषी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी या कार्यक्रमाला राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, औसा भाजपाचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, ज्येष्ठ नेते सुशील दादा बाजपाई, एडवोकेट मुक्तेश्वर वाघमारे, एडवोकेट अरविंद कुलकर्णी, काकासाहेब मोरे, प्राध्यापक भीमाशंकर राचट्टे, युवा नेते संतोष मुक्ता, गटनेते सुरेश उटगे, माजी नगराध्यक्ष किरण उटगे, शहराध्यक्ष लहु कांबळे,कठंप्पा मुळे, भीमाशंकर मिटकरी, ज्योतीबाई हलकुडे, सुकेशन ताई जाधव, दत्ता चेवले, धनराज परचने,फय्युम शेख,पप्पु शेख आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.