*जिल्ह्यामध्ये हैदराबाद मुक्ती संग्रामचा उत्सवविविध उपक्रमांनी साजरा होणार*
दि. 20 - उस्मानाबाद -
यावर्षी लोहारा तालुक्यातील हिप्परग्याच्या राष्ट्रीय शाळेस शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या शाळेची हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या अनुषंगाने महत्त्वाची भूमिका राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारतात सामील होताना मराठवाडा महाराष्ट्रात आला. त्याचेही विशिष्ट असे महत्त्व आहे. निजामाविरुद्ध लढल्या गेलेल्या हैदराबाद मुक्तीसंग्रामासही स्वातंत्र्य लढ्याच्या अनुषंगाने खूप महत्त्व आहे. हैदराबाद मुक्तीसंग्राम आणि भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात इतिहास तज्ज्ञ, लेखक, विचारवंत आणि ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञांसोबत बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
ज्यातून या मुक्तीसंग्रामाची आणि त्यातही उस्मानाबाद जिल्ह्यातील मुक्तीसंग्रामाच्या लढ्याची भाव पिढीला ओळख होईल. यासाठी विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत शालेय अभ्यासक्रमाच्या धर्तीवर पुस्तक प्रकाशित करण्यात येईल. तसेच या मुक्तीसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या संदर्भानी विविध अठरा विषयांवर मान्यवरांकडून लेखन लिहून घेऊन त्यांचाही एक ग्रंथ प्रकाशित करण्यात येईल. विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने, मुक्तीसंग्रामात प्रत्यक्ष सहभागी झालेले आणि ज्यांनी मुक्तीसंग्राम पाहिला आहे, अशांच्या आठवणींचे दृकश्राव्य स्वरूपात चित्रीकरण करण्यात येणार आहे.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, लातूर येथील बाबासाहेब परांजपे फौंडेशनचे सचिन भाऊसाहेब उमाटे, प्रा. नारायण मुदगलवाड, राज कुलकर्णी, रवींद्र केसकर, केतन पुरी,अविनाश राठोड आदी उपस्थित होते.
*महाराष्ट्र रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक * 9975640170
Mail :Laturreporter2012g@gmail. com
Web :www.laturreporter.in
**उस्मानाबाद * रिपोर्टर सय्यद महेबुब अली **
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.