अनेक प्रश्नांवर गाजली बेलकुंड ची ग्रामसभा
बेलकुंड च्या ग्रामस्थांनी फेटाळले देशी दारु दुकानाची मागणी
औसा प्रतिनिधी विलास तपासे
आज दिनांक ७ सप्टेंबर रोजी बेलकुंड येथे ग्रामसभा घेण्यात आली ग्रामसेवक विकास फडणवीस यांनी तंटामुक्ती अध्यक्ष दक्षता समिती यांची निवडीचा प्रस्ताव ठेवला देशी बिअर शॉप बिअर बार यांच्या मागणीसाठी दहा ते बारा अर्ज आले होते बेलकुंड येथील ग्रामस्थांनी देशी दारू दूकानला विरोध केला देशी दारुचे दुकान गावात नको असा ठराव घेतला.
त्यावेळी गावामध्ये अवैध रित्या विक्री
मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे गावामध्ये भांडणे
व तंटे होत आहेत कमी वयाची मुले दारूच्या आरी गेल्या मूळे दारुचे व्यसन लागत आहे त्यामुळे आज ग्रामपंचायत मध्ये अवैध रित्या दारु विक्री बंद करण्याचा ठराव घेण्यात आला तसेच सिंहगड बारचे लायसन बंद करण्याचाही ठराव घेण्यात आला
गावातील गायरान जमीनीवर झालेले अतिक्रम व तिथे असलेले साहित्यचा हिशोब मागितला व तेथे असलेल्या गोडाऊन मध्ये शेतकऱ्याला शेतातील माल ठेवण्याचे गोडाऊन तयार करावे व ते संपूर्ण जागा ग्राम पंचायत ने ताब्यात घ्यावी अश्या विविध मागण्या करुन अनेक प्रश्न उपस्थित करून बेलकुंड ग्रामपंचायत ला अनेक प्रश्नांनी बेलकुंड ची ग्रामसभा गाजली यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष पदी शकिल जमाल शेख यांची निवड करण्यात आली उपाध्यक्ष पदी दत्तु हलकरे दक्षता समिती ची हि निवड करण्यात आली अध्यपदि शिवाजी वाघमोडे यांची निवड करण्यात आली त्यावेळी सरपंच विष्णु कोळी उपसरपंच सचिन पवार, ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य अपसिंगेकर सोमनाथ कांबळे, भिमराव शिंदे,बलभीम बंडगर, रघुनाथ पवार, दादा पवार, पोलीस पाटील व्यंकट साळुंके, नानासाहेब निकतेआदि शंभर पेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.