आशिव मातोळा परिसरात दमदार पाऊस ऊसाचा फड आडवा आशिव मध्ये आमदार अभिमन्यू पवार यांनी केली पाहणी
औसा प्रतिनिधी विलास तपासे
औसा तालुक्यात पाहटे 4पासून दुपारी 4पर्यंत 12तास पाऊस चालू होता गेल्या 2दिवसापसून पावसाने हजेरी लावल्याने मातोळा, आशिव परिसरात ऊस आडवा झाला आहे सोयाबीनच्या रानामध्ये पानी शिरले आहे लघुतलाव मध्ममतलाव भरलेआहे बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पानी वाहत आहे औसा तालुक्यात वारी रात्रीपासून दमदार पाऊस पडला असून 7 महसुल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. दिर्घकाळाच्या विश्रातीनंतर पडलेल्या पावसाने तालुकयाभरातील शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. तथापी यामध्ये काही भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात माहिती मिळताच झालेल्या नुकसानीची पाहणी करून तातडीने नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश असे आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. गेल्या दोन तीन दिवसापासून चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी तालुक्यातील काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले
मागच्या काही दिवसांतील सततच्या पावसामुळे आणि वादळामुळे ऊस, कोथिंबीर, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. आज आशिव गावातील शेतकरी अशोक बंडगर, युवराज पाटील. दत्तू जगताप यांच्या शेतात जाऊन अभिमन्यू पवार यांनी पाहणी केली यां. परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस आडवा पडला आहे, पाणी लागून कोथिंबीरचे प्लॉट्स खराब झाले आहेत तर सोयाबीन पिकाचे ]ही नुकसान झाले आहे. ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन अभिमन्यू पवार यांनी गावातील नुकसानीचा आढावा घेतला.
यावेळी सरपंच गोविंग मदने, उपसरपंच रमेश वळके, माजी जि प सदस्य बी के माने, युवराज पाटील, विनोद जगताप, हनुमंत माने, त्र्यंबक घोडके, रावसाहेब वळके, गोविंद जगताप, दस्तगीर शेख, मोहन आंबेकर, तंटामुक्तचे अध्यक्ष शिवाजी सावंत व शेतकरी बांधव उपस्थित होते.
औसा तालुक्यातील मातोळा सह तालुक्यासह अचानक विजेच्या कडकडाटात वादळीवाऱ्यासह जोरदार पावसामुळे अनेक शेतकरी बांधव यांचे ऊस भुईसपाट झाल्यांचे दिसत आहे .खुप दिवसांच्या विश्रांतीनंतर अचानक वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने सर्वात जास्त ऊसाचे क्षेत्र असणाऱ्या मातोळा आशिव भागात,अनेक गावांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ऊस आडवा पडल्याने उसाचे वजन घटण्याची दाट शक्यता असते.त्यामुळे मातोळ्यातील शेतकरी सूभाष राजे.शीवाजी भोसले .राजेंद्र गोरे .महादेव गोरे .नेताजी भोसले .बाळासाहेब भोसले माधवराव भोसले .खंडू भोसले .गोटू दारफळकर शहाजी भोसले अशा अनेक बळीराजांचा उस अडवा पडल्याने शेतकरी हवालदील झाल्याचे चीञ आहे .मातोळा येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तरी कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी बांधव करत आहेत.
दिनांक 7/09/2021 रोजीचे मंडळनिहाय पर्जन्यमान
(मी.मी.मध्ये) तालुका औसा
मंडळ आजचे एकूण
विभाग पर्जन्यमान
१) औसा 07 (597)
२) भादा 07 (466)
३) किल्लारी 06 (705)
४) लामजना 04 (550)
५) मातोळा 06 (686)
६) किनीथोट 20 (527)
७) बेलकुंड. 12 (476)
आजचे एकूण पर्जन्य 62 mm.
आजचे सरासरी पर्जन्य 8.85 mm.
आजपर्यंतचे एकूण पर्जन्य 3907 mm.
आजपर्यंतचे सरासरी पर्जन्य 558.14
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.