बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज यूनियन, औरंगाबाद.
नोकरभरतीसाठी महाबँक कर्मचार्याच्या आंदोलनास सुरुवात प्रखर संघर्षास तयार रहा.
कॉ. धनंजय कुलकर्णी
लातूर दि. ०६ बँक ऑफ महाराष्ट्र या देशातील अग्रगण्य राष्ट्रियकृत बँकेतील सर्वच कर्मचारी संघटना एकवटुन आजपासून आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनच्या पहिल्या टप्प्यात बँक ऑफ महाराष्ट्रातील देशभरातील १८७२ शाखांतून काम करणाऱ्या कर्मचार्यानी आज मंगलवार दि. ०७.०९:२०२१ रोजी नोकरभरती करा असे बिल्ले परिधान करुन सुरुवात करून आजचा दिवस मागणी दिवस म्हणून पाळला.
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाविषयी माहिती देताना बँक कर्मच्यांचे नेते व महाबँकेतील सर्वच कर्मचारी संघटनाचे समन्वयक कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी अशी माहिती दिली कि बँकेतील ११४५ शाखातुन सफाई कर्मचारी नेमलेले नाहीत तर ६४५ शाखातुन शिपाई नेमलेले नाहीत. यातील ३६० शाखातून सफाई कर्मचारी तसेच शिपाई ही दोन्ही पदे रिक्त आहेत, याचा बँकेच्या ग्राहक सेवेवर विपिरित परिणाम होत असून ग्राहकांना अनावश्यक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय बँकेने मृत्य, निवृत्ती, पदोन्नती, स्वेच्छानिवृत्ती यामुळे रिकाम्या झालेल्या क्लार्क च्या जागेवर नेमणुका केलेल्या नाहीत. एकीकडे या काळात सरकारने जनधन योजना राबवली ही खाती आधारशी जोडली, नंतर पेन्शन, स्कॉलरशिप, अनुदान वाटप ही सगळी कामे बँकातून सुरू केली याशिवाय सरकार आता बँकातून प्रधानमंत्री जीवन विमा योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, प्रधानमंत्री वय वंदन योजना, मुद्रा योजना, स्टॅन्ड अप इंडिया, मेक इन इंडिया यासारखे उपक्रम बँकेमार्फत राबवत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढत आहे तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी फक्त एक दिवसाची देखील रजा घेता येत नाही. याबरोबरच बँकेने शाखा तसेच एटीएम वर नेमलेले सुरक्षारक्षक काढून टाकले आहेत ज्यामुळे कर्मचाऱ्यांत एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
संघटनेशी केलेले करार धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांशी निगडीत सर्व प्रश्नांवर व्यवस्थापनातर्फे एकतर्फी निर्णय घेतले जात आहेत. हे सगळे प्रश्न घेऊन महाबँकेतील कर्मचाऱ्यांनी 7 सप्टेम्बर मागणी दिवस पाळून आंदोलनाला सुरुवात करून 8 सप्टेम्बर ते 14 सप्टेम्बर दरम्यान बँकेच्या चेअरमन यांना ई-मेल द्वारे आवाहन पत्र सादर करणार आहेत. यानंतर 15 सप्टेम्बर रोजी देशभरातील झोनाल ऑफिसेस पुढे धरणे तर 22 सप्टेम्बर रोजी महाबँकेचे मुख्य कार्यालय पुणे येथे संघटनेतर्फे महा धरणे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे ज्यात देशभरातील सर्वच संघटनांतील पाचशेवर कर्मचारी सहभागी होतील आणि एवढे करून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सन्माननीय तोडगा निघाला नाही तर महा बँकेतील कर्मचारी संघटनांचे सर्व कर्मचारी 27 सप्टेम्बर रोजी एक दिवसीय तर 21 आणि 22 सप्टेम्बर रोजी 2 दिवसीय लाक्षणिक देशव्यापी संप करतील.
कॉ.धनंजय कुलकर्णी
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.