नवीन व्यापारी संकुलाला तळ्याचे स्वरूप
व्यापारी त्रस्त
औसा (प्रतिनिधी)दि.7
औसा नगरपालिकेने लाखो रुपये खर्चून बसस्थानकासमोर बांधलेल्या नवीन व्यापारी संकुलाच्या पार्किंगमध्ये सहा फूट पाणी साचले असून या परिसरातील
व्यापारी त्रस्त झाले आहेत. मागील आठवड्यात झालेल्या मोठ्या पावसाने आणि 2 दिवसापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे नवीन व्यापारी संकुलाच्या पार्किंगमध्ये पाणी साचले असून या ठिकाणाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
बसस्थानकाच्या शौचालयाच्या बाजूने या ठिकाणी घाण पाणी येत असून या घाणीमुळे डासाचे प्रमाणही वाढले आहे. नवीन गाळेधारक या ठिकाणी व्यवसाय करीत असून येथील व्यवसायिकांना अत्यंत त्रास होत आहे. तसेच या व्यापारी संकुलाच्या पाण्याला आउटलेट नसल्यामुळे हे पाणी पार्किंग मध्येच थांबले आहे. तसेच व्यापारी संकुलाच्या पायऱ्या च्या बाजूने पाणी साचल्यामुळे लहान मुले, वृद्ध, व महिला याठिकाणी पाण्यात पडण्याची भीती निर्माण झाली आहे. पाण्यात पडल्यानंतर जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष अफसर शेख व मुख्याधिकारी वसुधा फड यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन नवीन व्यापारी संकुलाच्या पार्किंग मधील पाण्याचा उपसा करावा अशी मागणी येथील व्यापारी वर्गातून होत आहे.
नगर पालिकेने लाखो रुपये खर्च करुन सदरील व्यापारी संकुल बांधलेले आहे. परंतू याठिकाणी अवैध धंदे हेही या ठिकाणी चालत आहेत. ईमारत देखभाल होणेही तितकेच म्हतवाचे आहे. या ठिकाणी असलेल्या लिफ्टच्या तिसऱ्या मजल्यावरुन लिफ्ट मध्ये गेल्याच महिन्यात एक व्यक्ती तिसऱ्या मजल्यावरुन सरळ तळ मजल्यात आला. परंतु त्यांचे नसीब बलवत्तर होते म्हणून सुदैवाने त्याला कसल्याही प्रकारची ईजा झालेली नाही. अन्यथा त्याच्या जिवाचे कांही बरे वाईट झाले असते तर कोणाला दोशी ठरवले जाईल. नगर परिषद प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन येथील व्यापाऱ्याची होणारी गैरसोय दुर करावी आशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.