स्वतःचे अपयश झाकण्यासाठी उपमहापौर यांचे उपोषण - विद्याताई पाटील..

 स्वतःचे अपयश झाकण्यासाठी उपमहापौर यांचे उपोषण - विद्याताई पाटील.. 









लातूर /प्रतिनिधी : - लातूर शहर महानगरपालिकेचे उपमहापौर हे महापालिकेसमोर उपोषणास बसले असून उपमहापौर सारख्या महत्त्वपूर्ण पदावर असलेल्या व्यक्तींनी प्रशासनाला धारेवर धरून जनतेची कामे करून सर्वसामान्य जनतेला न्याय देणे अपेक्षित आहे.  शहरातील जनतेची अनेक कामे प्रलंबित आहेत, ही कामे वेळेत मार्गी लावण्यासाठी उपमहापौरांनी आणि महापालिके मधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी समन्वय ठेवून कामे करून घेणे आवश्यक आहे, परंतु प्रशासनावर त्यांची पकड दिसून येत नाही. एका अर्थाने प्रशासनावर त्यांची पकड नसल्यामुळे जनतेची कामे करण्यासाठी उपमहापौर यांची असमर्थता दिसत आहे. आपले अपयश झाकण्यासाठी प्रशासनाकडे बोट दाखवून महापालिकेसमोर उपोषण करणे हे योग्य नाही, असा आरोप  काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्याताई पाटील यांनी केला. लातूर शहरातील स्वच्छता, विद्युत व्यवस्था तसेच इतर प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी उपमहापौरांनी प्रशासनावर आपला वचक ठेवून अधिकारी व कर्मचाऱ्यांशी समन्वय ठेवून कामे करून घेणे अपेक्षित असताना उपोषणाचा मार्ग निवडणे योग्य नाही. प्रशासनावर पकड निर्माण करून जनतेची कामे होत नसतील तर उपमहापौर यांनी आणि पदाचा राजीनामा द्यावा, असेही विद्याताई पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या