*उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना खबरदारीचा इशारा* -
उस्मानाबाद रिपोर्टर न्यूज़ बीयूरो
जिल्हयात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.पडणा-या पावसाबाबत तसेच काही जिवित आणि वित्त हानी झाल्यास, त्या बाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास द्यावी.आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी.या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्हयातील सर्व शेतकरी,नागरिक यांनी खबरदारी घ्यावी. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.
विजांचा कडकडाट सुरु असताना नागरिकांनी घराबाहेर जाण्याचे टाळावे.विजेचा कडकडाट होत असताना शेतकऱ्यांनी शेतीची आणि इतर कामे करु नयेत.आपली जनावरे झाडाखाली,पाण्याच्या स्त्रोताजवळ,विद्युत खांबा जवळ बांधू नयेत, त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे.आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करुन स्वत:सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्यावा.पाऊस सुरु असताना विजेच्या तारा आणि जुन्या इमारती कोसळण्याची दाट शक्यता असते, तरी अशा ठिकाणांपासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी.गावातील नदी,नाले,ओढे या ठिकाणी जाऊ नये. तसेच पुलावरुन पाणी वाहत असताना रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करु नये.गावातील गाव तलाव आणि लहान, मोठे,मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याची दाट शक्यता आहे.अशा ठिकाणी लोकांनी राहू नये.जनावरे बांधू नयेत.असेही आवाहन करण्यात आले आहे.
*महाराष्ट्र रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक * 9975640170
Mail :Laturreporter2012g@gmail. com
Web :www.laturreporter.in
**उस्मानाबाद * रिपोर्टर सय्यद महेबुब अली **
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.