सिना कोळेगाव धरणात स्थानिक मच्छीमारांना परवानगी 'जनशक्ती' संघटनेच्या आंदोलनाला यश*

 *सिना कोळेगाव धरणात स्थानिक मच्छीमारांना परवानगी 'जनशक्ती' संघटनेच्या आंदोलनाला यश*







दि. 8 - उस्मानाबाद -


येथील सीना-कोळेगाव धरणात करमाळा व परांडा तालुक्यातील स्थानिक मच्छिमारांना मासेमारी साठी परवानगी पास देण्याचे आदेश आज दि. ७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले असुन जनशक्ती संघटनेने प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांचा नेतृत्वाखाली दोन दिवस केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनाला मोठे यश आल्याने मच्छीमार बांधवांनी प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीबाहेर एकप्रकारे विजयी जल्लोष करुन आनंद व्यक्त केला.


याबाबत वृत्त असे की, सिना-कोळेगाव धरणामध्ये केरळ व आंध्रप्रदेश येथील मच्छिमारांना मच्छीमारीसाठी परवाना असल्याने स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे अतुल खूपसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती संघटनेने दि.३ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे या आंदोलनाची धग दोन दिवस राहिली. अर्धनग्न, खुर्चीला मस्त्याहार, अर्धनग्न अवस्थेत चौथ्या मजल्यावर ठिय्या, यावेळी एका मच्छीमाराने विष प्राशन केले, एका महिलेने उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला, रात्रभर मुक्काम आंदोलन आणि दुसऱ्या दिवशी रक्तदान आंदोलन केले. शेवटी पोलीस प्रशासनाने लाठीमार करत बळाचा वापर करुन महिला व चिमुकल्यांना अटक केली. 



दरम्यान याचवेळी मस्त्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक आयुक्त बिराजदार यांनी स्थानिक मच्छीमारांना परवानगी पास देण्याची ग्वाही दिली व यासंदर्भात दि.७ रोजी बैठक घेण्याचे लेखी पत्र दिल्याने आंदोलनाला तुर्तास यश आले होते. आज यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे पाटील, मच्छीमार बांधव यांची जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार गणेश माळी, प्रादेशिक उपायुक्त हंसराज बिरादार, मत्स्यव्यवसाय अधिकारी नाडे ब. नी, उपविभागीय मोतीचंद राठोड, पोलीस निरीक्षक दराडे व मस्त्य ठेकेदार बालाजी सल्ले यांच्यामध्ये बैठक संपन्न झाली. या झालेल्या बैठकीत स्थानिक मच्छीमारांना परवानगी पास देण्याचे आदेश मस्त्यव्यवसाय विभागाला देण्यात आले आहेत.



इकडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर येताच 'जनशक्ती संघटनेचा विजय असो, अतुल भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' आदी घोषणांनी परिसर दणाणून निघाला तर मच्छीमार बांधवांच्या वतीने अतुल खुपसे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोहन नाईकनवरे, राणा वाघमारे, कल्याण गवळी, राम इटकर, बालाजी भुई, बाळासाहेब पवार, विकास ननवरे, हेमा शिंदे, नाना भुई, मानसिंग सल्ले, पदमसिंह शिंदे, जगन्नाथ काळे, दत्तात्रय मलाव, परशुराम मलाव, धोंडिबा भुई, समाधान भुई, लहू सल्ले, किरण नगरे, सचिन भुई, रुपंचद भुई, अंकुश भुई, चंदू सल्ले, रामा चव्हाण आदीसह मच्छीमार बांधव उपस्थित होत


... *अन् ठेकेदारावर दाखल झाला गुन्हा* 


- 3 सप्टेंबर रोजी मत्स्यव्यवसाय कार्यालयात जनशक्ती संघटनेने आंदोलन जाहीर केले त्यानुसार त्यांनी लोकशाही मारणे आंदोलन देखील केले मात्र त्याच दिवशी सकाळी ठेकेदार बालाजी सल्ले यांनी व्हाट्सअप स्टेटस ला बंदुक हातामध्ये धरुन स्वतःचित्र चे चित्र ठेवुन त्याखाली 'अगर हम मैदान मे ऊतरेंगे तो सारे खिलाडी अपना खेल भूल जायेंगे' असे लिखाण केल्यामुळे मच्छीमार बांधवांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले होते. दरम्यान बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना खूपसे पाटलांनी सदर बाब निदर्शनास आणून देताच जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि लागलीच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.



*महाराष्ट्र रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक * 9975640170

Mail :Laturreporter2012g@gmail. com

Web :www.laturreporter.in

 **उस्मानाबाद * रिपोर्टर सय्यद महेबुब अली **

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या