*शेतकरी कष्टकरी महिला सुशिक्षित बेरोजगार यांच्या प्रश्नाची जाण असणारं नेतृत्व या महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्र्याच्या रूपाने मिळालं लोककल्याणकारी योजना अमलात आल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांचे प्रतिपादन
उजनी :दिनांक 4 नोव्हेंबर 2024 रोजी उजनी येथे शेकडो युवक व असंख्य महिलांनी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी घेतलेले निर्णय होत असलेली अंमलबजावणी लोकांना मिळत असलेला फायदा या सगळ्या गोष्टीचा विचार करून शिवसेनेमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते प्रवेश केला
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की या राज्याचे नेतृत्व बावन कशी सोन आहे दीनदुबळ्या दलित शेतकरी कष्टकरी माता भगिनी सुशिक्षित बेरोजगार या सर्वांच्या प्रश्नांची जाण असणारं नेतृत्व आहे आणि या प्रश्नाला सर्वांना दिलासा देण्यासाठीच योगदान असणार नेतृत्व म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सर्व घटकाला सोबत घेऊन महाराष्ट्राचा विकासाचा रथ मार्गस्थ करण्यासाठी विकासाबरोबर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी असंख्य निर्णय घेतले त्याचे फलित काय असेल तर आज झालेला शेकडो तरुणांचा असंख्य महिलांचा शिवसेनेमधला प्रवेश याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद आण्णाआर्य यांनी आपल्या मनोगतात महाविकास आघाडीने सत्ता आल्यापासून कस्कल्या ही पद्धतीचा विकास केला नाही फक्त आणि फक्त जाती देश निर्माण करून जातीजातीमध्ये दंगल भडकवणे आणि जातीवादी राजकारण करणे या पलीकडे काहीही केलेलं नसून मित्रहो येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सतर्क राहून त्या जातीजातीमध्ये तेड करणाऱ्या जातीय दंगली भडकवणाऱ्या महाविकास आघाडीला या महाराष्ट्रातून हद्दपार करायचा आहे आणि औसा तालुक्याचे भाग्यच आहे की आज आपल्याला सर्व जाती धर्मांना एकत्रित करून सर्व जाती धर्माचा विकासाची नोट बांधून काम करणारा आमदार लाभलेला आहे एका माळकरी घराण्यात जन्माला सर्वसाधारण कुटुंबातला सद्गुनी कार्यकर्ता आज आमदार म्हणून आपल्याला मिळाला आणि आपल्या तालुक्यामध्ये विकासाची गंगा वाहू लागली यापुढेही या तालुक्याचा याहीपेक्षा अधिक विकास करायचा असेल तर माननीय आमदार अभिमन्यु पवार साहेब यांना प्रचंड मताने निवडून द्यावं असे आव्हान शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद अण्णा आर्य यांनी केले त्यानंतर औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे मनोगत व्यक्त करत असताना म्हणाले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातल्या सर्वच जाती धर्मातील कष्टकरी शेतकरी शेतमजूर या सर्व घटकातील लोकांच्या विकासाचा ध्यास घेऊन या सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मारून अनेक लोकहित कारक उपयोगी निर्णय घेतलेले त्यामधली सर्वात जास्त पॉप्युलर झालेला निर्णय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये महिला सक्षमीकरणासाठी आज प्रत्येक महिन्याला प्रत्येक माझ्या माता भगिनींना दीड हजार रुपये मिळतात या दीड हजाराचा मोल या सावत्र भावांना काय माहिती काही गावात गेल्यानंतर बऱ्याचशा माता भगिनी भेटल्या आणि त्यांनी या दीड हजारात काय काय झालं त्यांचा अनुभव सांगितलं आतापर्यंत कोणी ही आम्हाला अशी मदत केली नाही पण आमच्या लाडक्या मुख्यमंत्री भावाने आम्हाला ओवाळणी दिली या दीड हजाराने माझी दिवाळी चांगली झाली कोणी म्हणत या दीड हजारामुळे माझ्या घरातल्या ज्येष्ठांचा आजारपणात मी खर्च करू शकले गोळ्या औषध, यावर खर्च केला,कोणी म्हणे माझ्या मुलाबाळांना कपडे आले कोणी म्हणतात संसाराला हातभार लागला या दीड हजाराचा मोल या लाडक्या बहिणी पेक्षा जास्तीच कुणाला कळेल असं मला वाटत नाही आणि हेच सावत्र भाऊ ही योजना बंद पाडण्याच्या मार्गावर आहेत या भावांना येथे वीस तारखेला मतदानाच्या स्वरूपातून चांगलाच धडा शिकवल्याशिवाय माझ्या माता भगिनी थांबनार नाहीत, आज आपल्याकडे बरेच जण प्रचाराच्या माध्यमातून या ठिकाणी येत आहे आणि प्रचार करते वेळेस म्हणत आहेत ते आमदाराला डीपी माहिती नाही शेत माहिती नाही राड माहित नाही,पण मी सांगतो या आमदाराला सर्व काही माहिती आहे शेतकऱ्याच्या अडचणीची जाण आहे म्हणूनच तर या तालुक्याच्या सर्व सब स्टेशनला दोन दोन मोबाईल डीपी दिलेला आहे डीपी बिघडला की तो ट्रॅक्टरचा डीपी आणून लावायचा आणि आपल्या पिकाला पाणी चालू करायचं हे आतापर्यंतच्या एकाही आमदाराने महाराष्ट्रामध्ये न केलेली योजना आहे ही योजना आपल्या आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी शेतकऱ्याची जाण असल्यामुळे शेतकऱ्याचा डीपी ची माहिती असल्यामुळे केली त्या डीपीतल्या रॉडची माहिती असल्यामुळे केली आणि म्हणत आहेत कसलं बी काम राहिले की देवेंद्र फडणवीस काहीही राहिलं देवेंद्र फडणवीस होय आमदार साहेब देवेंद्र फडवणीस यांना फोन करतात या तालुक्याच्या विकासाचा निधी मागण्यासाठी फोन करतात या तालुक्याचा विकास निधी खेचून आणण्यासाठी फोन करतात होय उठलं की त्यांच्याकडे जातात कुठलं की पैसा मागून आणतात आणि त्या पैशातून या तालुक्याचा विकास करतात म्हणून देवेंद्र फडणवीस माहित आहे म्हणून जमलेल्या माझ्या तमाम माता भगिनींना मी हात जोडून विनंती करतो माझ्या बांधवांना हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला मतदान केंद्रावर त्या खपटाच्या आड गेलं की दिसलं चिन्ह कमळाचे दाब बटन दिसल कमळाचे चिन्ह दाब बटन असं करून आमदार अभिमन्यू पवार यांना परत एकदा या महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायचं आणि हे15 वर्षा नंतर उठून बाकीचे जे बोलत आहे त्यांना बरोबर कुठून आले तिथेच पाठवायचं म्हणजेच ...... गुऱ्हाळात.. हा हिंगास... गुराळातच पाठवायचं आहेतआज संजय रंधवे व त्यांच्या पत्नी यांच्या दोघांच्या पुढाकाराने उजनी मधील एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला प्रवेश प्रवेशांमध्ये संजय रंधवे महमूद शेरीकर सुनीताताई रंधवे रंजनाताई रंधवे यांच्यासह लखन सूर्यवंशी विशाल गायकवाड हनुमंत खंडागळे अंबादास खंडागळे श्रीमंत डोके मारुती वाघमारे महादेव वाघमारे लक्ष्मण गायकवाड विशाल गायकवाड गणपती खंडागळे तानाजी खंडागळे लखन सूर्यवंशी विशाल गायकवाड महादेव सगट वंदना खंडागळे नंदाबाई खंडागळे रंजनाबाई खंडागळे लताबाई डोपे, जैतून बी शेख समा शेख लक्ष्मी दळवे मन्ना भाभी मुलानी फरिदा सय्यद संगीता कागे ज्योत्स्ना डेपो मंगल वाघमारे अंजली वाघमारे वैशाली वाघमारे वंदनाबाई गायकवाड पौर्णिमा गायकवाड दक्षप्रजा खंडागळे संध्या ताई खंडागळे यासह उजनी गावातील उ बा ठा,काँग्रेस, पक्षातील पदाधिकारी महिला पुरुष यांनी मोठ्या प्रमाणावर शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख श्री शिवाजीराव माने साहेब युवा सेना जिल्हाप्रमुख युवराज वंजारे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अर्चनाताई बिरादार, उपजिल्हाप्रमुख विनोद अण्णा आर्य उपजिल्हाप्रमुख तसेच कार्यालय प्रमुख विष्णू साबदे, शिवसेना औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे, ज्येष्ठ मार्गदर्शक बी.के. दादा उजनी गावचे सरपंच युवराज गायकवाड, युवा सेना जिल्हा चिटणीस महावीर चव्हाण युवा सेना महानगर प्रमुख महेश चांदणे दयानंद चव्हाण मिराज पटेल यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.