विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात १९३ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत यापैकी ८७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १०६ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, आदर्श आचारसंहिता कक्षाच्या नोडल अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे यांच्यासह पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यासोबतच आदर्श आचारसंहितेचा भंग होवू नये, यासाठी विविध पथकांद्वारे कार्यवाही सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील २ हजार १४३ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून यासाठी मतदान पथके गठीत करण्यात आली आहेत. यासोबतच इतरही अनुषंगिक तयारी पूर्ण करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक यांचे जिल्ह्यात आगमन झाले असून लातूर शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे कार्यालय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी यावेळी माहिती दिली. विविध कारवायांमध्ये दाखल गुन्हे, तसेच निवडणूक काळात अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांनी २९ ऑक्टोबर २०२४ अखेर मतदारसंख्या, जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांची माहिती दिली.
लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणारे उमेदवार, त्यांचा पक्ष (कंसात निवडणूक चिन्ह)
234- लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ-
1. धिरज विलासराव देशमुख- इंडियन नॅशनल काँग्रेस (हात)
2. रमेश काशीराम कराड- भारतीय जनता पार्टी (कमळ)
3. संतोष गणपतराव नागरगोजे- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन)
4. डॉ. नितीन वाघे- संपूर्ण भारत क्रांती पार्टी (ट्रम्पेट)
5. बालकिशन शंकर आडसूळ- राष्ट्रीय समाज पक्ष (शिट्टी)
6. डॉ. अजनीकर विजय रघुनाथराव - वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर)
7. समाधान बळीराम गोरे- पिपल्स पार्टी ऑफ इंडिया-डेमॉक्रॅटिक (संगणक)
8. समाधान भारत शिंदे- महाराष्ट्र स्वराज्य पार्टी (पेनाची निब सात किरणासह)
9. अमन ईश्वर सुरवसे- अपक्ष (एअर कंडिशनर)
10. गडगळे राजकुमार मारोती- अपक्ष )कपाट)
11. झेटे सचिन विठ्ठल- अपक्ष (ऊस शेतकरी)
12. बावणे डॉ. दत्ता - अपक्ष (टीलर)
13. दिपक राजाभाऊ इंगळे- अपक्ष (खाट)
14. नंदकिशोर शंकरराव साळुंके- अपक्ष (स्पॅनर)
15. पंकज रावसाहेब देशमुख- अपक्ष (ऑटो रिक्शा)
16. बालाजी रामराव मोरे- अपक्ष (टेबल)
17. लक्ष्मीकांत माणिकराव जोगदंड- अपक्ष (गॅस शेगडी)
18. सौ. सुमीत्राबाई ऊर्फ स्वाती विक्रम जाधव पाटील- अपक्ष (बॅट)
235- लातूर शहर विधानसभा मतदारसंघ-
1. अमित विलासराव देशमुख- इंडियन नॅशनल काँग्रेस (हात)
2. डॉ. अर्चना पाटील चाकुरकर- भारतीय जनता पार्टी (कमळ)
3. सिध्दार्थ महादेव सुर्यवंशी- बहुजन समाज पार्टी (हत्ती)
4. अनिल गोरोबा गायकवाड- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-ए (रोड रोलर)
5. गौसोदिन उस्मान शेख- स्वराज्य सेना पार्टी (हिरा)
6. घोणे नरसिंह पांडुरंग- निर्भय महाराष्ट्र पार्टी (सीसीटीव्ही कॅमेरा)
7. पंकज जैस्वाल- पिपल्स पार्टी ऑफ इंडिया-डेमॉक्रॅटीक (संगणक)
8. भास्कर दत्तात्रय बंडेवार- बहुजन भारत पार्टी (ट्रम्पेट)
9. रावसाहेब सिद्राम करपे- राष्ट्रीय समाज पक्ष (शिट्टी)
10. विनोद सोमप्रकाश खटके- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर)
11. सतीश राजेंद्र करंडे- महाराष्ट्र स्वराज्य पार्टी (पेनाची निब सात किरणांसह)
12. संतोष संभाजी साबदे- जय हिंद जय भारत राष्ट्रीय पार्टी (रबर स्टँम्प)
13. अख्तरमिया जलाल शेख- अपक्ष (पाटी)
14. आनंद अंकुश लामतुरे- अपक्ष (काडेपेटी)
15. आश्विन सुभाषराव नलबले- अपक्ष (ऑटो रिक्शा)
16. ईलाही बशिरसाब शेख- अपक्ष (बॅट)
17. नौशाद इकबाल शेख- अपक्ष (कपाट)
18. प्रविण माणिकराव माने- अपक्ष (लिफाफा)
19. प्रसाद सिद्राम कोळी- अपक्ष (नागरीक)
20. बाबासाहेब गोरोबा सितापूरे- अपक्ष (अंगठी)
21. मंगेश नागनाथ ईळेकर- अपक्ष (हेल्मेट)
22. राजीव ऊर्फ राजकुमार दामोधरराव पाटील- अपक्ष (दूरदर्शन)
23. लक्ष्मीकांत माणिकराव जोगदंड- अपक्ष (चालण्याची काठी)
236- अहमदपूर विधानसभा मतदारसंघ-
1. ॲड. गायकवाड रमेश श्रीरंगराव- बहुजन समाज पार्टी (हत्ती)
2. जाधव पाटील विनायकराव किशनराव- नॅशनॅलिस्ट काँगेस पार्टी - शरदचंद्र पवार (तुतारी वाजवणारा माणूस )
3. डॉ. नरसिंह उध्दवराव भिकाने- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन)
4. बाबासाहेब मोहनराव पाटील- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (घड्याळ)
5. गणेश नामदेवराव हाके- जन सुराज्य शक्ती (शिट्टी)
6. गिरजाप्पा काशिनाथ बैकरे- महाराष्ट्र विकास आघाडी (गॅस सिलेंडर)
7. जाधव विनायक सोनबा- राष्ट्रीय मराठा पार्टी (ट्रम्पेट)
8. धीरज मधुकर कांबळे- सैनिक समाज पार्टी (कपाट)
9. ॲड. रियाज अहमद निसार अहमद सिद्दीकी- जनहित लोकशाही पार्टी (किटली)
10. वागलगावे रावसाहेब निवृत्तीराव- बहुजन विकास आघाडी (ट्रक)
11. उत्तम चंद्रकांत वाघ- अपक्ष (ऊस शेतकरी)
12. ॲड. एकनाथ ज्ञानोबा गजिले- अपक्ष (जहाज)
13. कदम पुंडलीक विठ्ठल- अपक्ष (लॅपटॉप)
14. जाधव गणेश दौलतराव- अपक्ष (ऑटो रिक्शा)
15. दिपक अर्जून कांबळे- अपक्ष (सफरचंद)
16. बालाजी रामचंद्र पाटील चाकुरकर- अपक्ष (प्रेशर कुकर)
17. महादेव नागोराव भंडारे- अपक्ष (सीसीटीव्ही कॅमेरा)
18. माधव रंगनाथ जाधव- अपक्ष (रोड रोलर)
19. विशाल शिवहर बालकुंदे- अपक्ष (एअर कंडिशनर)
20. संजीव राम चन्नागीरे- अपक्ष (शिवण यंत्र)
237- उदगीर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ-
1. दिपक अशोक सावंत- बहुजन समाज पक्ष (हत्ती)
2. सुधाकर संग्राम भालेराव- नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)- तुतारी वाजवणारा माणूस
3. संजय बाबुराव बनसोडे- नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (घडयाळ)
4. भास्कर दत्तात्रय बंडेवार- बहुजन भारत पार्टी (ट्रम्पेट)
5. प्रा. डॉ. शिवाजी मरेप्पा देवनाळे- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर)
6. अजय पिराजी कांबळे- अपक्ष (कोट)
7. गुरुदेव नरसिंग सुर्यवंशी- अपक्ष (बॅटरी टॉर्च)
8. प्रभाकर केरबा कांबळे- अपक्ष (ग्रामोफोन)
9. बालाजी किशनराव सुर्यवंशी- अपक्ष (सितार)
10. बालाजी केशव कांबळे- अपक्ष (खाट)
11. बालाजी रामराव मोरे- अपक्ष (किटली)
12. ॲड. योगेश नरसिंगराव उदगीरकर- अपक्ष (काचेचा पेला)
13. स्वप्नील अनिल जाधव- अपक्ष (पेट्रोल पंप)
238- निलंगा विधानसभा मतदारसंघ-
1. अभय सतिश साळुंके- इंडियन नॅशनल काँग्रेस (हात)
2. कांबळे ज्ञानेश्वर साधू- बहुजन समाज पार्टी (हत्ती)
3. निलंगेकर संभाजी दिलीपराव पाटील- भारतीय जनता पार्टी (कमळ)
4. आकाश प्रकाश पाटील- राष्ट्रीय मराठा पार्टी (फुलकोबी)
5. नागनाथ रामराव बोडके- राष्ट्रीय समाज पक्ष (शिट्टी)
6. सौ. मंजु हिरालाल निंबाळकर- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर)
7. हणमंत धनुरे- प्रहर जनशक्ती पक्ष (बॅट)
8. अन्वर हुसेन मैनोद्दीन सय्यद- अपक्ष (कपाट)
9. दत्तात्रय भानुदास सुर्यवंशी- अपक्ष (किटली)
10. दत्तात्रय विश्वनाथ सुर्यवंशी- अपक्ष (एअर कंडिशनर)
11. निळकंट गोविंदराव बिरादार- अपक्ष (ऊस शेतकरी)
12. फयाजमियाँ पाशामियाँ शेख- अपक्ष (सफरचंद)
13. महेबुब पाशा खुर्शीद अहमद मुल्ला- अपक्ष (ऑटो रिक्शा)
239- औसा विधानसभा मतदारसंघ-
1. प्रा. डॉ. अनिल सुग्रीव कांबळे-बहुजन समाज पार्टी (हत्ती)
2. अभिमन्यू दत्तात्रय पवार-भारतीय जनता पार्टी (कमळ)
3. दिनकर बाबुराव माने- शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे (मशाल)
4. नागराळे शिवकुमार गंगाधर- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन)
5. अनिल शिवाजी जाधव- जनहित लोकशाही पार्टी (किटली)
6. आकाश महादेव पुजारी- न्यु राष्ट्रीय समाज पार्टी (ट्रम्पेट)
7. ज्योतिराम गुलाब शिंदे- निर्भय महाराष्ट्र पार्टी (सीसीटीव्ही कॅमेरा)
8. नौशाद इकबाल शेख- स्वराज्य शक्ती सेना (हिरा)
9. शाम चंद्रकांत गोरे- राष्ट्रीय समाज पक्ष- ऊस शेतकरी
10. भाई शिवाजी बाबुराव सुरवसे- पीझन्टस् ॲण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया (ऑटो रिक्शा)
11. उत्तम सदाशिव घोडके- अपक्ष (रोड रोलर)
12. दगडू वसंत माने- अपक्ष (नागरीक)
13. नरसिंग दिलीप जाधव- अपक्ष (चिमणी)
14. नागनाथ ग्यानु मुगळे- अपक्ष (शिट्टी )
15. नितीन उत्तरेश्वर पवार- अपक्ष (शिवण यंत्र)
16. मनोहर आनंदराव पाटील- अपक्ष (बॅटरी टॉर्च)
17. राजेंद्र पंडु मोरे- अपक्ष (बॅट)
18. शिवाजी केराप्पा कुंभार- अपक्ष (गॅस सिलेंडर)
19. हणमंत व्यंकट कारले- अपक्ष (पेनाची निब सात किरणांसह)
Chief Electoral Officer Maharashtra
Collector & District Magistrate,
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.