कडेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा --डी एस देशमुख

कडेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा --डी एस देशमुख 


 अन्यथा तहसील कार्यालयावरुन उडी मार आंदोलन करणार






कडेगाव:प्रतिनीधी

       कडेगाव मधील नगरपंचायतीत मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरु आहे नगरपंचायतीच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत कडेगाव मध्ये हाय स्पीड लॅम्पचे काम एका कंपनीला दिले असुन त्या लॅम्पची सात वर्षीची जबाबदारी कंपनीची आहे तरीही हे लॅम्प बंद अवस्थेत आहेत तरीही नगरपंचायत याबाबत कार्यवाही करताना दिसत नाही या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी अन्यथा तहसील कार्यालयावरुन उडी मार आंदोलन करणार असल्याचे निवेदन पाणी संघर्ष समितिचे प्रमुख राष्ट्रवादीचे नेते डी एस देशमुख व वंचीत आघाडीचे जिवन करकटे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे 

        या निवेदनात देशमुख व करकटे म्हणाले आहेत की कडेगाव मधील बालोद्यान कोणत्या सि टी सर्व्ह गटात मंजुर करुन उभारले आहे याचीही माहीती द्यावी तसेच धर्मो गल्ली ओढ्याकाठी हे बालोद्यान उभारले असुन या बालोद्यानाला ओढ्याच्या पाण्याचा फटका बसत असुन या छोट्याशा जागेत लहान मुलांना खेळण्यास वाव नाही

        तसेच या बालोद्यानामध्ये उभारलेले साहीत्य हे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे ते साहीत्य मोडकळीस येवुन पडले आहे या साहीत्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसुन येत आहे तसेच वॉटर एटी एम टेंडर होवुनही झालेले नाही ते पाणी लोकांना विकत घ्यावे लागत आहे त्यापेक्षा कडेगाव पाणी पुरवठा योजनेवर फिल्टर बसवुन शुध्द पाण्याचा पुरवठा लोकांना करावा यासह विवीध मागण्यांचे निवेदन दिले आहे याबाबत योग्य ती कार्यवाही न झालेस 18 तारखेला राष्ट्रवादी व वंचीत आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावरुन उडी मार आंदोलन करणार असल्याचे डी एस देशमुख व जीवन करकटे म्हणाले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या