कडेगाव तालुक्यातील निकृष्ट रस्त्याबाबत , रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करून शासनाचे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले
*प्रतिनिधी समीर तांबोळी*
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडेगाव तालुक्याच्या वतीने कडेगाव तालुक्यातील निकृष्ट रस्त्याबाबत , रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करून शासनाचे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक कडेगाव तालुक्यातील खड्डेमय रस्ते व पूर्णपणे निकृष्ट झालेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी पंचायत समिती बांधकाम विभाग यांना वेळोवेळी निवेदनाच्या माध्यमातून विनंती केली होती तरी आज अखेर कोणती उपाययोजना रस्ते दुरुस्त करण्याच्या बाबतीत झालेली नसल्यामुळे खड्ड्यात वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे त्यावेळी तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष सतीश येताळ तालुका सचिव प्रशांत पाटील ,उपविभाग अध्यक्ष अजय शिंदे, विभाग अध्यक्ष शंकर जगदाळे ,तसेच महाराष्ट्र सैनिक विश्वजीत काकडे, महेश पवार, प्रतिक जाधव ,सागर मोहिते, सुमित जाधव ,विश्वजीत मोहिते, संग्राम भिसे ,विवेक पवार हे उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.