टाका बिरवली वड्यात शेतकऱ्यांची सोयाबीनची बनीम वाहून गेली पावसाच्या संततधारेमुळे उरल्यासुरल्या पिकांची नासाडी

 टाका बिरवली वड्यात शेतकऱ्यांची सोयाबीनची बनीम वाहून गेली 

पावसाच्या संततधारेमुळे उरल्यासुरल्या पिकांची 

नासाडी












औसा प्रतिनिधी विलास तपासे 

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे 8 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी टाका बिरवली वड्याला मोठ्या प्रमाणात ओव्हर फ्लो झाला त्यामुळे टाका येथील शेतकरी प्रल्हाद राम कलाल यांच्या शेतामध्ये अडीच एकरचे सोयाबीन चे काड काढुन ठेवले होते त्यावर ताडपत्री झापून ठेवली होती ओढ्याला इतका पुर आला की अक्षरशः शेतामध्ये पाणी जावून ते ओढ्यात वाहुन गेले  दगडाला अडकल्यामुळे थोडेफार शेतकऱ्यांच्या हाती पडले बाकी सर्व सोयाबीनची बनीम पाण्यात वाहून गेली याची माहिती मिळताच तलाठी योगेश मिश्रा यांनी पंचनामा करून हा रिपोर्ट तहसील ला सादर केला आहे या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरत आहे

मागील आठवडय़ात अतिवृष्टी मुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने पुन्हा हिरावून घेतल्याने शेतकरी चिंतेत आहेत असे असताना पाऊस मात्र अजूनपर्यंत येथील शेतकऱ्यांचा पिच्छा सोडत नसल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबर महिना सुरु होऊनही येथे पावसाची रोज हजेरी असुन शुक्रवारी दुपारी मोठा पाऊस पडला परिणामी शेतातील उरल्यासुरल्या पिकांची यामुळे नासाडी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हवाहवासा वाटणारा पाऊस आता नकोसा वाटत असल्याचे चित्र दिसत आहे पावसाने धुमाकुळ घालून शेतीचे व पिकांचे नुकसान केले आहे मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी पावसाने खरिप हंगाम शेतकऱ्यांच्या हाती लागु दिला नाही त्या अनुषंगाने नुकसानीचे पंचनामे सुरू आहे शासनाने नेहमी प्रमाणे तुटपुंजी मदतही जाहिर केल्याचे ऐकायला मिळत आहे

दरम्यान झालेल्या नुकसानीतुन उरल्यासुरल्या पिकांची काढणी शेतकरी करीत असताना पाऊस अडथळा निर्माण करत असुन हाती काही लागु देत नसल्याचे दिसून येते   शेतकरी यावर्षी पावसाला वैतागले आहेत कधी ऊन तर कधी पाऊस हे समीकरण सध्या या भागात असल्याने कामाचा खोळंबा होत आहे त्यातच हवामान खात्याकडून पुढे परतीचा पाऊस येणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत उरली सुरली पिके काढण्यासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत उत्पादन खर्च तरी निघावा यासाठी शेतकऱ्यांची तळमळ आहे..

बाजारपेठत सोयाबीनचे दर कोसळत असल्याचे तोही शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. 

दरम्यान सध्या शेतकरी अतिवृष्टी नासाडी झालेल्या पिकांची काढणी करीत असुन त्यासाठीदेखील त्यांना 4500 ते 5000 रूपये प्रति बॅग मोजावे लागत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या