शहरी माओवाद हे देशासमोरील सर्वात मोठे आव्हान भरत आमदापुरे लिखित पुस्तकाचे प्रकाशन
लातूर/प्रतिनिधी:शहरी माओवाद हे देशासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.देशासाठी हा मोठा धोका असल्याचे मत राजर्षि शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव गव्हाणे यांनी व्यक्त केले.
एल्गार परीषद खटल्यातील सत्य काय?शहरी माओवाद, फुटीरतावादांच्या देशविघातक कारवाया याचे सविस्तर विश्लेषण करणारे भरत आमदापुरे लिखित ' शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला 'या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी अध्यक्षस्थानावरून गव्हाणे बोलत होते.
पत्रकार भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जनाधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय कांबळे,विवेक विचार मंचचे प्रदेश समन्वयक सागर कांबळे यांची उपस्थिती होती.
शहरी माओवाद
देशासाठी अतिशय धोकादायक आहे.विविध प्रकारचे फुटीरतावादी वेगवेगळ्या रूपात कारवाया करताना दिसतात.अशा कारवायांना समाजमान्यता मुळीच मिळता कामा नये.ज्याप्रकारे एक क्रांती म्हणून नक्षलवादी देशविरोधी कारवाया करत असतात त्याच प्रकारे शहरामध्येही असे लोक काम करत आहेत.शहरी माओवादी हे देशासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.विविध संघटनांच्या माध्यमातून असे लोक पुढे येत असून अशा लोकांच्या देशविघातक कारवायांचा बुरखा फाडणारे हे पुस्तक आहे,असे मत प्राचार्य गव्हाणे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन अधिवक्ता परिषद,भारत विकास परिषद आणि विवेक विचार मंचच्या वतीने करण्यात आले होते.
शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून शहरी माओवाद म्हणजे नेमकं काय? हे समजून घेतले.
पुस्तक प्रकाशनापूर्वी विवेक विचार मंचचे पूर्णवेळ कार्यकर्ते आणि या पुस्तकाचे लेखक भरत आमदापूरे यांनी पुस्तक लिखाणामागची आपली भूमिका,पुस्तक लिहिताना घेतलेले संदर्भ, एल्गार परिषद खटल्याबाबत असणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भूमिका,शहरी माओवादाचा वाढणारा धोका,त्यातून देशविघातक कारवायांचे वाढणारे प्रमाण यावर प्रास्ताविकात भूमिका विषद केली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विवेक विचार मंचचे जिल्हा संयोजक गुरुप्रसाद हुंडेकर,मकरंद गिरी यांनी परिश्रम घेतले.शहरातील विचारवंत,वकील यांची कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मकरंद गिरी यांनी केले.त्यानंतर संविधानाचे वाचन हृषिकेश सकनुर, प्रास्ताविक ॲड.जगन्नाथ चिताडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड.सुनैना बायस यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.