पहिल्या व दुसर्या दिवशी पाठ्यपुस्तके
व गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत
महाराष्ट्र विद्यालयाचा उपक्रम ः विद्यार्थी संख्येमध्ये वाढ
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाचे सर्व नियम पाळून 4 आक्टोबर रोजी जेएसपीएम अंतर्गत चालणार्या मजगे नगर येथील महाराष्ट्र विद्यालयात ऑफलाईन शालेय सत्रास उत्साहात प्रारंभ करण्यात आला असून शाळेच्या पहिल्या व दूसर्या दिवशीही शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गुलाबपुष्प देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क,सॅनिटायजरचे महत्त्व पटवून देवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर पाळण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नोडलचे नोडलप्रमुख गोविंद बोळगे, प्राचार्य मोहन खुरदळे यांच्याहस्ते शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते. तब्बल दीड वर्षानंतर सुरू झालेल्या शाळांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहीले. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी,पालक व शिक्षक वर्गात दूसर्या दिवशीही उत्साहाचे वातावरण दिसून आले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.