राष्ट्रीय स्तर अबॅकस स्पर्धेत कु. आराध्या पाठक हिचे यश.
औसा : (प्रतिनिधी )मेट्रो ब्रेन या संस्थेमार्फत मोहोळ (सोलापूर) येथे घेण्यात आलेल्या सातव्या राष्ट्रीय स्तर अबॅकस स्पर्धेत औशाच्या गंगापूरे मेट्रो ब्रेन अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. या प्रामुख्याने झेड थ्री लेव्हल अवॉर्ड मध्ये आराध्या गोपाळ पाठक व पुष्कर माधव गंगापूरे याने झेड आर थ्री लेव्हल अवॉर्ड प्राप्त केले.
तर समृद्धी शिराळ, अंकिता स्वामी, प्रिती नरहरे, विभावरी वाघमारे, संकेत आडे, भार्गव वाघमारे या विद्यार्थ्यांना अचिव्हमेंट अवॉर्ड प्राप्त झाले आहेत. सर्वच विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष संतोष लोहारे यांच्या हस्ते शिक्षिका विद्या भोजने यांना बेस्ट टीचर अर्वाडने सन्मानित करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक होत आहे. औसा येथील संस्थेने उज्ज्वल यशाची परंपरा यंदाही कायम राखली असून, गुणवंताचा मोहोळ येथे सत्कार करण्यात आला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.