गॅलेक्सी पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
सोलापूर- बाणेगांव येथील गॅलेक्सी पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शाळेच्या प्रांगणात उत्साहात पडले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सिने व नाट्य अभिनेते अमीर तडवळकर तर अध्यक्षस्थानी मयुरेश्वर फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा गॅलक्सी पब्लिक स्कूलचे प्रोजेक्ट डायरेक्टर स्वप्निल राऊत उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात नटराज व सरस्वती यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. तत्पूर्वी पाहुण्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. सुहास राऊत यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
प्रारंभी डायरेक्टर स्वप्नील राऊत यांनी प्रास्ताविकात सांगितले की, गॅलक्सी पब्लिक स्कूल हे उत्तर सोलापूर तालुक्यात पालकांच्या पसंतीची शाळा बनत आहे. भारतातील नामवंत आघाडीच्या 500 शाळांमध्ये सामील होण्याचा या शाळेचा मानस आहे.
या स्नेह संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी समाजिक विषयावर नाट्यप्रयोग, मराठी व हिंदी गीत, देशभक्ती गीत व काही हास्य नाटकें अशा वेगवेगळ्या कलाकृती सदर करून उपस्थितांची दाद मिळविली. यामध्ये खास आकर्षण ठरलेले देशभक्ती गीत आणि हॉरोर शो हे जास्त खास आर्कषण ठरले.
प्रमुख पाहुणे अमीर तडवळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शाळेची व्यवस्थापक मंडळ यांनी विद्यार्थ्यांच्या कलगुणांना वाब देण्यासाठी शाळा नेहमीच पुढे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले कला सादर करण्याची जागा उपलब्ध मिळते तसेच शिक्षणात ही चांगले प्रकारे ज्ञान देऊन मुलांच्या भविष्य घडवित आहे त्यामुळे या शाळेची उत्तर सोलापूर तालुक्यात पालकांची आपल्या पाल्यासाठी ही शाळा जास्त पसंती आहे.
मागील आठवड्यात शाळेमध्ये क्रीडा महोत्सव देखील आयोजित करण्यात आले होते. यामध्येही विद्यार्थ्यांनी वेगवगळ्या क्रीडा प्रकारात क्रिकेट, लंगडी, बुद्धिबळ, धावणे, लिंबू चमचा भाग घेतला होता. या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांचे हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. हे स्नेहसंमेलन व्यवस्थित पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.