ऑर्बीट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

 ऑर्बीट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.  








     








 


औसा (प्रतिनिधी) दि.26 जानेवारी 2025 रोजी ऑर्बीट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेत "प्रजासत्ताक दिन" उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक सकाळचे प्रतिनिधी जलील पठाण तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून इंजि.अजहर हाश्मी,मुज्जकीर काझी,शेख गुलामरसूल सरदार,डॉ. शोएब राहिमोद्दीन शेख,आरिफ शेख,हाफिज परवेज शेख,इस्माईल सरगुरु,संस्थेचे अध्यक्ष शेख रसुलसाब गुरुजी यांची उपस्थिती होती.ध्वजारोहण इंजि.अजहर हाश्मी यांनी केले.नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे स्वागत करण्यात आले तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे शब्दसुमनानांनी स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षिका सालेहा शेख यांनी केले.प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर विध्यार्थ्यांचे देशभक्तिपर भाषणे झाली.त्यामध्ये सर्वांचे लक्ष लहान मुलांच्या भाषण स्पर्धा,लहान मुलांनी साकारलेली स्वातंत्र्य सेनानी यांची वेशभूषा व सांस्कृतिक कार्यक्रमाने वेधले.कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धा मधील प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन अमूल्य मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास इंजि.शहबाज शेख,अमन शेख,परवेज शेख,संपादक मजहर पटेल,ॲड.इकबाल शेख,जहीर इनामदार,बासीद शेख,इसाक शेख, सय्यद इम्रान,जावेद कच्ची,कुर्बान शेख,अखलाक सिद्धीकी,सिराज पटेल तसेच शाळेतील सर्व शिक्षिका,विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शेख अंजमुनेहा इकबाल,सहशिक्षिका पठाण तहेनियत,तरंन्नूम पटेल,शेख सालेहा, शेख फरीसा,अश्विनी वायाळ,शेख मुस्कान,आफरीन सिद्दीकी,सानिया जमादार,पटेल आयेशा,सायमा इनामदार,उमर शेख,रेहान शेख यांनी परिश्रम घेतले.शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन आभार प्रदर्शन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सालेहा शेख यांनी केले तर आभार शेख अंजुमनेहा यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या