*03लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त.02 गुन्हे दाखल. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांचे पथक व पोलीस ठाणे शिरूर आनंतपाळ पोलिसांची संयुक्त कारवाई.*
लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.अनिकेत कदम ,उपविभागीय पोलिस अधिकारी,चाकूर यांनी त्यांचे उपविभागीय कार्यालय व उपविभागातील पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून चाकूर पोलीस उपविभागातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.
त्याप्रमाणे उपविभाग चाकूर हद्दीमधील अवैध धंदेची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याकरिता माहिती काढत असताना सदरच्या संयुक्त पथकास बातमीदारां कडून खात्रीशीर माहिती मिळाली की, शिरूर आनंतपाळ परिसरामधील काही किराणा दुकान मधून प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची विक्री होत आहे.
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहनिशा करून सदर ठिकाणी छापा मारला असता साई किराणा अँड जनरल स्टोअर असे नाव असलेल्या दुकानात शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे, महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटका व सुगंधित पानमसाला असा एकूण 02 लाख 97 हजार 368 रुपयांचा गुटखा मिळवून आला. तसेच आणखीन एक ठिकाणी छापा मारला असता त्या ठिकाणी पण 4 हजार 250 रुपयाचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित पान मसाला तंबाखू मिळून आले.
त्यावरून सहाय्यक आयुक्त कार्यालय, लातूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल सटवाजी लोंढे यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळ येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 249/ 2021 व 250/2021 कलम 328,188, 272, 273 भा.द.वि. तसेच अन्नसुरक्षा आणि मानदे अधिनियम 2006 कलम-59 अन्वये प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैद्य साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारे
1) संजय बसवंत सलगरे, वय 46 वर्ष, राहणार किसान गल्ली, शिरूर अनंतपाळ
2) आकाश अशोक कोरे वय 24 वर्ष राहणार चन्ना बसवेश्वर चौक शिरूर आनंतपाळ.
यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करून सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.एस.डी.सुडके हे करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक श्री.सुडके यांचे नेतृत्वात स.फौजदार लक्ष्मण पाटील, पोलीस अमलदार विकास लोखंडे,श्रीरंग सगर,संतोष हाके,विकास अर्जूने,कदम कलमे, पुट्टेवाड यांनी पार पाडली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.