औसा येथे राष्ट्रवादीच्या दोन्ही नगरसेवकांनी आयोजित केलेल्या लसीकरणाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

 औसा येथे राष्ट्रवादीच्या दोन्ही नगरसेवकांनी आयोजित केलेल्या लसीकरणाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


शेख बी जी.










औसा.दि.४ औसा येथे आज दिनांक ४ रोजी सकाळी १०ते ५ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी  लसीकरणाचा मोहीम आयोजित केली होती.या आयोजित केलेल्या लसीकरण मोहिमेत शहरातील जनतेनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले.लसीकरणा मध्ये महिलांची सोय स्वतंत्ररीत्या करण्यात आली होती. त्यामुळे एकीकडे महिलांचे लसीकरण चालू असताना दुसऱ्या बाजूला पुरुषांच्या लसीकरणाला ही गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. या लसीकरणा मध्ये 18 ते पुढील वयोगटातील अनेकांनी सहभाग नोंदवला. ज्यांनी पहिला डोस घेतला नाही असे व ज्यांचा दुसरा डोस ची तारीख आली आहे अशा अनेक नागरिकांनी यावेळी लसीकरणाचा मोहिमेचा फायदा घेतला. राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक शेख जावेद व नगरसेवक मुजाहिद शेख यांनी लसीकरण मोहीम आयोजित केली होती. जावेद शेख यांनी प्रभाग क्रमांक 3 मध्ये आपल्या संपर्क कार्यालयात लसीकरण मोहीम आयोजित केली होती. तर मुजाहेद शेख यांनी प्रभाग क्रमांक दहा मध्ये लसीकरण मोहीम आयोजित केली होती. अनेकांनी  या लसीकरण मोहिमेचा फायदा घेतला. या लसीकरणाची विशेष बाब म्हणजे ज्या अपंग लोकांना लस घेण्यासाठी येता येत नाही अशा लोकांच्या घरी जाऊन प्रत्यक्षात नगरसेवकांनी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस दिल्याचे चित्र दिसून आले.


लसीकरणा मध्ये अनेकांना कोवॅक्सिन लस न मिळाल्याने अनेकांना परत जावे लागले. लस संपली मात्र जनतेचा प्रतिसाद संपला नसल्याचे चित्र या वेळेला दिसून आले. लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य कर्मचारी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या