औसा नगराध्यक्ष चे उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक पुन्हा राष्ट्रवादीला सत्ता द्या 100 कोटी रुपये चे विकास कामा साठी निधी अजित पवार यांची ग्वाही

 औसा नगराध्यक्षा चे उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक पुन्हा राष्ट्रवादीला सत्ता द्या 100  कोटी रुपये चे विकास कामा साठी निधी अजित पवार यांची ग्वाही







 औसा प्रतिनिधी

 औसा नगर परिषदेच्या माध्यमातून मागील पाच वर्षांमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी विविध विकासाची कामे करण्याचा सपाटा लावला. औसा हे मराठवाड्यातले ऐतिहासिक शहर असून या शहराला विविध विकासाच्या माध्यमातून वेगळे स्वरूप प्राप्त होत आहे. औसा शहराला 37 किलोमीटर अंतरावरून माकणी धरणाचा पाणीपुरवठा, शिवकालीन मराठा भवन, नगर परिषद सांस्कृतिक सभागृहाचे नूतनीकरण, व्यापारी संकुल, जलतरण तलाव, तलाव संवर्धन हरित पट्टा अशा विविध कामामुळे औसा शहराच्या वैभवात भर पडली आहे. नगराध्यक्ष अफसर शेख मुख्याधिकारी वसुधा फड व त्यांना नगर परिषदेच्या सर्व नगरसेवक कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून औसा नगरपरिषदेने विकासाची झेप घेतली आहे. त्यामुळे औसा नगरपालिका 10 कोटी रुपयाच्या स्वच्छ सर्वेक्षण च्या पारितोषिकाची मानकरी ठरली. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात औसा नगरपरिषद द्या, यांनी विकास कामासाठी 100 कोटी रुपये देतो, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली. औसा येथे नगर परिषदेच्या विविध विकास कामाच्या शुभारंभ व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. नगराध्यक्ष अफसर शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचे उपमुख्यमंत्र्यांनी भरभरून कौतुक केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री संजय बनसोडे ,आमदार बाबासाहेब पाटील, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे ,माजी आमदार विलासराव लांडे ,महिला आघाडीच्या आशाताई भिसे, बसवराज पाटील नागराळकर, संजय शेटे ,मुख्याधिकारी वसुधा फड ,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले सध्या शहरीकरण वाढत असून शहरांमध्ये बकाल वस्त्या निर्माण होत आहेत .त्यासाठी शहरांमध्ये अंतर्गत रस्ते घनकचरा व्यवस्थापन भूमिगत गटारे पथदिव्यांची व्यवस्था आणि इतर जागतिक नागरी सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे .कोरोना सारख्या संकट काळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जनतेला विविध सेवा देण्याचे कार्य करता आले .औसा नगर परिषदेच्या माध्यमातून ही कोरोना संकट काळामध्ये अतिशय चांगली कामगिरी करण्यात आली आहे. मी सातत्याने औसा नगरपरिषदेच्या कामाचा आढावा घेतो. त्यामुळे नगरपरिषदेने केलेल्या कामाबद्दल आपणास अभिमान वाटत आहे. औसा शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र ,सौर ऊर्जा प्रकल्प, किल्ला मैदान ते जलाल शही चौक सिमेंट रस्ता, कटघर गल्ली येथील हरित पट्टा तलाव संवर्धन आसह इतर अनेक विकास कामाचे शुभारंभ आणि भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते यावेळी संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीही पाणीपुरवठामंत्री म्हणून आपणास औसा ते माकणी पाणीपुरवठा योजना देता आली येणाऱ्या काळामध्ये जनतेनी वृक्षलागवड करून पर्यावरणाचे संतुलन साधावे शहर विकासासाठी आपण सातत्याने राज्यमंत्री म्हणून सहकार्य करू अशी ग्वाही दिली. आपल्या प्रास्ताविकातून बोलताना नगराध्यक्ष अफसर शेख म्हणाले की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी आपण सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या आशीर्वादामुळे शहरांमध्ये विकासाची अनेक कामे करता आली याचा मला अभिमान वाटतो येणाऱ्या काळात आपण जनतेच्या विकासाची कामे करीत असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे दर्जेदार आणि वेळेत करून जनतेला न्याय देण्याचा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असे आश्वासन दिले. नगर परिषद सांस्कृतिक सभागृहाच्या शेजारील मैदानात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड श्रीकांत सूर्यवंशी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या