एम आय एम च्या वतीने रास्ता रोको आंदोलन
औसा प्रतिनिधी
एम आय एम पक्ष औसाच्या वतीने तिसरा टप्पा जामा मस्जीद ते लातूर वेस हनुमान मंदिर रस्त्याचे रखडलेले काम त्वरित करावे या मागणीसाठी आज दिनांक 10 डिसेंबर 2021 शुक्रवार रोजी रास्ता रोकोआंदोलन करत औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले. या निवेदनात सविस्तर वृत्त असे औसा शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यामुळे ग्रामीण भागातील येणार्या जाणारे जनतेला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तिसऱ्या टप्प्यातील रस्ता रुंदीकरण जामा मजीत ते हनुमान मंदिर पर्यंतचा हा रस्ता मुख्य बाजार पेठेचा असून हा 60 फुटाचा असून सदर रस्त्यात येणारी वाहतूक लक्षात घेता हा रस्ता अरुंद होत आहे. म्हणून तो रस्ता 80 फूटाचा करावा. सिमेंट रोड न करता डांबरी रोड करण्यात यावे. सिमेंट रोड केल्यामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. व सिमेंट रस्त्यामुळे निसर्गावर परिणाम होऊन पाऊस वेळेवर होत नाही. याबाबत पक्षा मार्फत आपणास वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तरी मुख्य अधिकारी यांनी औसा शहरातील मुख्य रस्ता रुंदीकरण जामा मज्जीद ते हनुमान मंदिर 80 फुटाचा रस्ता मंजूर करून घेऊन तो डांबरी करणाने पूर्ण करावा. या मागणीसाठी एम आय एम पक्षाचे प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी रास्ता रोको आंदोलन केले. तरी याबाबत त्वरित दखल घेऊन तात्काळ काम पूर्ण करण्यात यावे अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एम आय एम पक्षाच्या वतीने देण्यात आले. यावेळी एम आय एम चे अजहर कुरेशी, मौलाना शेख, माझी पटवेकर मोईन बागवान, इस्राईल बागवान, बागवान समाजाचे अध्यक्ष अब्दुल हकीम बागवान, माजी नगरसेवक हाजी सत्तार बागवान आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.