औसा मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण द्या: मुस्लिम समाजाची मागणी

 औसा मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण द्या:

 मुस्लिम समाजाची मागणी






औसा प्रतिनिधी

मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज दिनांक 17 डिसेंबर 2021 सोमवार रोजी मुस्लिम समाजाच्या औसाच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन सादर केले. या निवेदनात सविस्तर वृत्त असे शासनाने वेळोवेळी अनेक आयोग व समित्या बनवून महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाच्या परिस्थिती बाबत आढावा घेतला व प्रत्येक आयोग व समित्यांना या समाजाला उन्नती व प्रगती करण्यासाठी शैक्षणिक आर्थिक व सामाजिक स्तरावर आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात जोडणे अनिवार्य असले बाबत शिफारस केलेली आहे. परंतु या राज्यातील अविभाज्य घटक असलेल्या मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत यापूर्वीच्या सरकारांनी  उदासीनता दाखवली ज्यामुळे समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे .आपणांस नम्रपणे निवेदन की, आपण सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नात्याने दिनांक 22 डिसेंबर 2021 पासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात आरक्षण बाबत ठोस निर्णय घेऊन अध्यादेश पारित करावा. जेणेकरून या समुदायास देशाच्या जडणघडणीमध्ये योगदान देण्याची संधी प्राप्त होईल तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी आम्ही औसा शहरातील मुस्लिम समुदाय दिनांक 22 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2021 या कालावधीत  सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत औसा तहसील कार्यालयासमोर साखळी धरणे आंदोलन करणार आहोत. या मागणीचे निवेदन औसा शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन मुख्यमंत्री यांना औसा तहसीलदार मार्फत सादर केले. यावेळी निवेदन सादर करताना नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख, शकील शेख, अडवोकेट समीयोदीन पटेल, मौलाना मुसा, मौलाना खादर, मौलाना  रफीक सिराजी,सय्यद मुजफ्फर अली इनामदार, अॅडव्होकेट फिरोज पठाण, अॅडव्होकेट शाहनवाज पटेल,खुंदमिर मुल्ला,मुजम्मिल शेख,अफसर शेख, महंमद युनुस चौधरी, डॉक्टर वहीद कुरेशी, सय्यद हमीद चांदसाब, अॅडव्होकेट सय्यद मुस्तफा,खाजा शेख,शफीयोदीन नांदुरगे,अली कुरेशी,एन के बागवान,वहीद चाऊस,मुजम्मील कुरेशी, शेख अनस, शेख इस्माईल,शहेबाज काझी,अजहर नांदुरगे, शेख नसीर निजामोदीन, इलियास चौधरी,मजहर पटेल,आसिफ पटेल, आफताब शेख,गोंवीद पवार,आदि उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या