लातूर शहरातील प्रभाग १० मधील संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराचा शुभारंभ.

 

लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव

यांच्या हस्ते लातूर शहरातील प्रभाग १० मधील

संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराचा शुभारंभ.





 

 लातूर प्रतिनिधी : शनिवार दि. ११ डिंसेबर:

  राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ लातूर शहरातील पात्र गोरगरीब वयोवृद्धांना द्यावा अशी सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली होती. त्यानुसार लातूर शहरातील प्रत्येक प्रभागात संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. रविवार दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष   ॲड. किरण जाधव यांच्या हस्ते लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील इंडिया नगर या ठिकाणी असलेल्या मनपा शाळा क्रमांक २८ परिसरात संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

   यावेळी  मनपा विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळसंजय गांधी निराधार योजना समिती लातूर शहरचे चेअरमन हकीम शेख, नगरसेविका कांचन आजनीकरआकाश भगतरत्नदीप आजनीकरसुनील पडिलेनगरसेवक असिफ बागवानसंजय गांधी निराधार अनुदान योजना समिती सदस्य दगडूआप्पा मिटकरीभालचंद्र सोनकांबळेमनोज देशमुखबंडू सोलंकर, विजय टाकेकरश्रीकांत गर्जेप्रा. प्रवीण कांबळेमहेश काळेराजू चिंताले, अमोल मानेबप्पा मार्डीकर उमाकांत राउतशैलेश भोसलेविनोद गलांडेहमजा पटेलॲड.. देवीदास बोरुळे पाटीलकरीम तांबोळी, अजय वागदरेस्वप्निल कंदले,  फरीद शेखआकाश मगर, कैफ काजीशेख बिलाल कार्यालयीन प्रभाग समन्वयक संतोष गडदे आदीसह काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारीकार्यकर्तेबूथप्रमुखनिराधार महिलापुरुष प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

  यावेळी बोलताना लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव म्हणाले कीशासकीय योजना कागदावर न राहता सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या दारापर्यंत गेली पाहिजे ही भूमिका राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घेतली आहे. पात्र लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारू लागू नये, त्यांचा वेळ व पैसा खर्च होऊ नये, त्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळावा याकरिता  शासन आपल्या दारी तहसील आपल्या दारी या अंतर्गत या शिबिराच्या माध्यमातून गरजू पात्र लाभार्थीना या योजनेचा लाभ देणे चालू आहे. नागरिकांना येणाऱ्या अडचणी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते हे सोडवुन देतील लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना संजय गांधी निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना सहाशे रुपये मदत मिळत होती ती त्यांनी बाराशे रुपये केली .देशमुख परिवार हा सर्वसामान्यांची काळजी घेणारा परिवार आहे कोरोणा काळात आरोग्याच्या सुखसुविधा उभारून पालकमंत्री अमित देशमुख यांनी मोठे काम केले. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याना मिळणाऱ्या बाराशे रुपये अनुदानातून सध्याच्या महागाईमुळे खर्च भागवणे निराधार व्यक्तींना अवघड जात आहे ते अनुदान येणाऱ्या काळात प्रती लाभार्थी दोन हजार रुपये करण्यासाठी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. 

पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच

सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका असते

  समाधान शिबीर प्रसंगी बोलतांना मनपा विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळ म्हणाले की, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या कल्पनेतून  या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री ना. देशमुख नेहमी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतात. लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांचे काम पालकमंत्री ना. अमित देशमुख पुढे घेऊन जात आहेत. या योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेल यासाठी सदभावनेतून आम्हीही काम करतोय निराधारांना आधार द्यावे ही काँग्रेसची भूमिका आहे. गोर गरीबांना न्याय देण्याचे काम काँग्रेस पक्ष नेहमी करतो, या गरजू गोरगरीबांचे सुपुत्र म्हणून पालकमंत्री ना. अमित देशमुख काम करत आहेत. जेणेकरून निराधारांना मिळणाऱ्या पगारातून त्यांचा खर्च भागेल. यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी सर्वसामान्यांच्या घरी जाऊन या योजनेची माहिती देऊन या योजनेचा अधिकाधिक लाभ गरजूंना मिळावा याकरिता प्रयत्न करीत आहोत.     सर्वसामान्यांच्या हक्काचा पैसा पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्या माध्यमातून मिळतोय. गोरगरीब पात्र लाभार्थ्यांचे समाधान शिबिराच्या माध्यमातून ते अश्रू पुसत आहेत. या शिबिराच्या माध्यमातून पात्र निराधारांना  आयुष्यभर समाधान मिळेल असेही त्यांनी सांगितले.

 

पात्र नागरिकांनी चुकीची माहिती देऊ नये

सर्व माहिती बरोबर द्यावी

  संजय गांधी निराधार योजना समिती लातूर शहरचे चेअरमन हकीम शेख म्हणाले की, पात्र नागरिकांनी चुकीची माहिती देऊ नये सर्व माहिती बरोबर द्यावी यामुळे खरा लाभार्थी वंचीत राहणार नाही. राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख हे पात्र सर्वसामान्यांना डोर टू डोर या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करत आहेत. गरीब, गरजुकडे त्यांचे लक्ष असतेकाँग्रेसचे पदाधिकारी नेते मतदान मागायला येत नाहीत तर सर्वसामान्यांच्या आडीआडचणीत धाऊन येतात असे सांगून त्यांनी उपस्थितांना संजय गांधी निराधार योजनेची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय टाकेकर यांनी केले तर शेवटी आभार नगरसेविका कांचन आजनीकर  यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या