दिव्यांग वधू- वर परिचय
मेळावा स्तूत्य उपक्रम ः चाकूरकर
मेळावा स्तूत्य उपक्रम ः चाकूरकर
लातूर / प्रतिनिधी- वधू- वर मेळावे खूप होतात. याची आवश्यकता हि आहे पण दिव्यांगाचा वधू- वर परिचय मेळावा हा स्तूत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन माजी गृहमंत्री श्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले.
शिवा लिंगायत युवा संघटनाचेवतीने आयोजित वधू- वर परिचय मेळाव्याचे दुसरे दिवशी समारोपाचे कार्यक्रमात श्री पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. बी. व्ही. मोतीपवळे होते.
आपल्या भाषणात बोलतांना श्री शिवराज पाटील म्हणाले. हा कार्यक्रम आवश्यक आहे. पण याबरोबरच सर्व समाजातील गरजुंना याचा लाभ होईल असे हि पहाणे गरजेचे आहे. आपल्या कृतीतून उपक्रमातून समाजातील सर्व घटकांमध्ये एकोपा निर्माण व्हावा म्हणून प्रयत्न होणे गरजेचे आहे. असे हि प्रतिपादन केले.
या कार्यक्रमात ऍड. व्यंकटराव बेद्रे, प्रा. रेवण शाबादे यांची भाषणे झाली. शिवा युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दयानंद पाटील यांनी प्रास्ताविक भाषण केले तर सौ. मनिषाताई बोळशेट्टे यांनी आभार मानले.
याप्रसंगी समाजातील मान्यवर श्री. टेकाळेअप्पा, श्री. उमाकांत खानापुरे, प्रा. डॉ. पटवारी, प्रभुअप्पा मुनाळे, श्री. संकाये, शिवप्पा अंकलकोटे यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचलन, श्री. बेडगे, प्रा. सौ. उमा मिरजगांवे, यांनी केले. प्रथमत मा. श्री. शिवराज पाटील यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमास मोठ्या संख्येने बंधू भगिनी व दिव्यांग वधू- वर उपस्थित होते.
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717
Mobile No. 9422071717
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.