मनोगत कला महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

 मनोगत कला महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर 





औसा (प्रतिनिधी) मनोगत प्रतिष्ठानच्यावतीने मागील २५ वर्षापासून मनोगत कला महोत्सवाची वैभवशाली सांस्कृतिक चळवळ अविरतपणे सुरू आहे. यावर्षी मनोगत प्रतिष्ठानच्या वतीने मनोगत कला महोत्सव साजरा करण्यासाठी कार्यकारणी निवड बैठक बुधवार दिनांक 1 डिसेंबर रोजी घेण्यात आली. मागील दोन वर्षापासून कोरोनाविषाणूच्या प्रादुर्भावामुळे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करता आले, नाही परंतु रसिक कलावंताचा आग्रह आणि रसिक श्रोत्यांची विनंती यावरून यावर्षी मनोगत कला महोत्सव साजरा करण्याचे या बैठकीमध्ये ठरविण्यात आले. यावर्षीच्या मनोगत कला महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून तिपणप्पा राचट्टे, उपाध्यक्ष शेख शकील,व अड़ शाम कुलकर्णी, स्वागताध्यक्ष पदी शिवलिंगप्पा औटी, कोषाध्यक्ष वैजनाथ इळेकर, महासचिव राम कांबळे, सचिवपदी दत्ता व्हांताळे आणि मेहबूब बक्षी, सहसचिव आसिफ पटेल व बालाजी शिंदे, मुख्य संयोजक पदी राजू पाटील, संयोजक प्रा.नंदकुमार हलकुडे, सहाय्यक संयोजक रामभाऊ जोगदंड व विनोद जाधव तर मार्गदर्शक समितीच्या अध्यक्षपदी विजूअप्पा मिटकरी व सदस्यपदी अड़ मुक्तेश्वर वागदरे अड़ शहानवाज पटेल, रविशंकर राचट्टे, धनंजय मिटकरी यांचा कार्यकारणी मध्ये समावेश आहे. ग्रामीण भागातील कलावंतांना आपल्या उत्कृष्ट कलेचे प्रदर्शन करण्यासाठी मनोगत प्रतिष्ठाने व्यासपीठ निर्माण केले असून मनोगत कला महोत्सवाच्या माध्यमातून या वर्षी कलावंतांना व रसिक श्रोत्यांना आनंद पर्वणी मिळणार आहे. मनोगत कला महोत्सवाच्या नूतन कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर हा कार्यक्रम दर्जेदार स्वरूपात साजरा करण्यात येईल अशी माहिती मुख्य संयोजक राजू पाटील यांनी बैठकीत दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या