चांडेश्वर येथील भागवत कथेने श्रोते मंत्रमुग्ध
औसा प्रतिनिधी
विश्वनाथ बापूराव नलावडे यांच्या स्मृतीनिमित्त चांडेश्वर तालुका लातूर येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे .या भागवत कथा कार्यक्रमांमध्ये कथा प्रवक्ता म्हणून भागवताचार्य गोपाळ शास्त्री महाराज वृंदावन गायक प्रज्ञानंद वानखेडे व लहुजी महाराज तबलावादन भागवत खुडे यांचे असून चांडेश्वर परिसरातील पंचक्रोशीतील भाविक भक्त या भागवत कथा कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत. दिनांक 4 डिसेंबर 2021 रोजी या कथेचा समारोप होणार आहे.हनुमान मंदीर चांडेश्रवर येथे ह भ प जनार्दन महाराज चलवाड यांचे काल्याचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे. तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी भागवत कथेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक श्रीमती मरगुबाई विश्वनाथ नलावडे व चांडेश्वर ग्रामस्थांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.