भादा येथे आजपासून खंडोबा यात्रा उत्सव

 भादा येथे आजपासून खंडोबा यात्रा उत्सव




बालाजी उबाळे 

औसा-औसा तालुक्यातील भादा येथे खंडोबा यात्रेनिमित्त मल्हार भक्तासाठी तीन दिवसाचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.

 औसा तालुक्यातील भादा व परिसरातील खंडोबा भक्त आणि नागरिक यांना दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भादा येथील खंडोबा यात्रा महोत्सव कार्यकारिणीने यात्रेनिमित्त लाभ घेण्याचा आव्हान केले आहे. यात्रेनिमित्त गुरुवार दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता श्री ची मिरवणूक सायंकाळी चार वाजता लंगर तोडणे, रात्री आठ वाजता काठी मिरवणूक चालू होईल शुक्रवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी 12 ते पाच वाघ्या मुरळी कार्यक्रम (जय मल्हार वाघ्या मुरळी पार्टी भादा)सायंकाळी साडे आठ वाजता ह भ प भगवान महाराज आळंदीकर यांचे कीर्तन शनिवार दि 11 डिसेंबर सकाळी 11 ते तीन वाघ्या मुरळी कार्यक्रम (शिव मल्हार वाघ्या मुरळी पार्टी भादा)दुपारी दोन ते पाच जंगी कुस्त्या चा कार्यक्रम रात्री नऊ वाजता वाघ्या मुरळी कार्यक्रम (रेणुका जेजुरीकर यांचा वाघ्या मुरळीचा कार्यक्रम)वरील प्रमाणे तीन दिवसांचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 तरी सर्व भादा व परिसरातील भाविक भक्तांनी खंडोबा यात्रेनिमित्त वरील तीन दिवसाच्या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ मंडळ भादा यांच्याकडून करण्यात येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या