दावतपुरचा विकासाचा पॅटर्न गावोगावी राबविण्याचा मानस रोहयो समितीचे अध्यक्ष विठ्ठल बेडजवळगे
औसा प्रतिनिधी दावतपुर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने पाणी फाउंडेशन ,स्वच्छता अभियान व रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावात विविध विकासाच्या कामाला चालना मिळाली. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना प्रभावीपणे राबवून गावांमध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना देता आल्या.यामध्ये 3 लाख 27 हजार रुपये सिंचन विहिरी साठी ,70 हजार रुपये शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या गोठ्यासाठी, बांधावर फळबाग लागवड करण्यासाठी 36 हजार रुपये, विहीर पुनर्भरण साठी 15 हजार रुपये, कंपोस्ट खतासाठी 8 हजार रुपये आणि गांडूळ खतासाठी प्रकल्प राबविण्यासाठी 14 हजार रुपयाचे अनुदान शेतकऱ्यांना मिळते. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 5 ते 6 लाख रुपयांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना मिळू शकतात. यामध्ये शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. आपण सर्व शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन ही योजना दावतपुर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविली असली तरी रोजगार हमी योजनेचे औसा तालुका अध्यक्ष म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाचा आर्थिक विकास करून स्वावलंबी जीवन जगावे यासाठी ही योजना गावोगावी घेऊन जाण्याचा आपला मानस असल्याचे दावतपूर ग्रामपंचायतीचे सरपंच तथा रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष विठ्ठल बेळजवळगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील आणि आमदार धीरज देशमुख तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या आशीर्वादाने आपल्याला औसा तालुका रोजगार हमी योजनेचे अध्यक्षपद मिळाले आहे. या पदाला न्याय देण्यासाठी आणि नेत्यांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून आपण येणाऱ्या काळात कार्य करीत राहू आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडावी याबद्दल प्रयत्नशील राहू असेही विठ्ठल बेळजवळगे यांनी शेवटी म्हटले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.