लातूर जिल्ह्यात ओमिक्रोन कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळला असून रुग्णास अती सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरू आहेत लातूरकरांनी घाबरून जावू नये. सतर्कता बाळगावी. महापौरांचे आवाहन

 

लातूरकरांनी घाबरून जावू नये. सतर्कता बाळगावी. 
महापौरांचे आवाहन

लातूर येथे ओमिक्रोन कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळला असून रुग्णास अती सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरू आहेत




लातूर येथे ओमिक्रोन कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळला असून रुग्णास अती सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरू आहेत. प्रशासन पूर्णतः सज्ज असून लातूरकरांनी घाबरून जावू नये परंतु सतर्कता बाळगावी असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.
परदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकाचा तपासणी केली जात असून ज्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे त्यांना अलगिकरण कक्ष येथे उपचार करण्यात येत आहेत. त्यापैकी एका रुग्णाचे नमुने अधिक तपासणीसाठी पाठविण्यात आले असता एका रुग्णास ओमिक्रोनची बाधा झाल्याचे समोर आले आहे. रुग्णास यापूर्वीच अलागिकरण कक्ष येथे उपचार सुरू असून त्यांना सौम्य लक्षणे आहेत व त्यांची प्रकृती उत्तम आहे. लातूरकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी लातूर मनपा प्रशासन, आरोग्य विभाग आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवित आहेत. लातूरकरांनी घाबरून जावू नये परंतु सतर्कता बाळगत मास्कचा वापर करावा तसेच ज्या व्यक्तींनी लस घेतली नसेल त्यांनी तातडीने लस घ्यावी, अनेक नागरिकांनी पहिला डोस घेतला असला तरीही वेळेत दुसरा डोस घ्यावा असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले.





१००% लासिकरणाचे मनपाचे नियोजन. ५० लसीकरण केंद्र कार्यरत.

लातूर शहरातील पात्र नागरिकांचे १००% लसीकरण केले जावे यासाठी मनपाचे नियोजन असून दररोज ५० लसीकरण केंद्राद्वारे लस देण्यात येत आहे. शहरातील सुमारे ८३% नागरिकांनी पहिला डोस घेतला असून लवकरच १००% नागरिकांना लस देण्याकरिता आरोग्य विभाग परिश्रम घेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या