पंतप्रधान आवास योजना....
८ कोटी ३५ लक्ष निधी उपलब्ध
६३४ लाभार्थ्यांना ३ कोटी ८८ लाख रुपयांचे वाटप तातडीने करण्याचे महापौरांचे आदेश
लातूर/प्रतिनिधी:लातूर शहरात पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी वेगाने केली जात असून या अंतर्गत लाभार्थी घराचे बांधकाम करत आहेत.
लाभार्थ्यांना बांधकामाच्या टप्प्यानुसार निधीचे वाटप केले जात आहे.या प्रक्रिये अंतर्गत शहरातील ६३४ लाभार्थ्यांना ३ कोटी ८८ लक्ष ४० हजार रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.
ज्या नागरिकांना स्वतःचे घर नाही त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी लातूर शहर महानगरपालिकेने पंतप्रधान आवास योजनेला प्राधान्य दिले.लाभार्थ्यांना लवकरात लवकर योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रक्रिया सुलभ केली.त्यामुळे अधिक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता आला.पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्यावतीने बांधकामासाठी टप्प्या-
टप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जातो.त्याच पद्धतीने तो लाभार्थ्यांना वितरित केला जातो.राज्य शासनाकडून म्हाडा मार्फत ३ कोटी १० लक्ष आणि केंद्र शासनाच्या हिस्श्यापोटी ५ कोटी २५ लक्ष रुपये असा एकूण ८ कोटी ३५ लक्ष रुपयांचा निधी महानगरपालिकेच्या खात्यावर जमा झाला आहे. हा निधी शहरातील लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला.एकूण ६३४ लाभार्थ्यांना हा निधी वाटप केला जात असून शुक्रवार पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.