ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका घेवू नका
ओबीसी काँग्रेसचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
लातूर दि. १६.
राज्य सरकारने ओबीसी आरक्षण अध्यादेश सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने समाजाला कुठल्याही निवडणुका लढवता येणार नाही त्यामुळे ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका घेवू नये अशी मागणी लातूर जिल्हा ओबीसी काँग्रेसच्या वतीने लातूर जिल्हाधिकारी याना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले असुन ओबीसी आरक्षण घालवण्याचे पाप केंद्रातील मोदी सरकारने केले आहेत त्यामुळे आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका घेवू नये अन्यथा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे
राज्य सरकारने स्थानीक स्वराज्य निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण साठी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती मात्र ती फेटाळल्याने समाजाला मोठा अन्याय झाला आहे २०१० साली कृष्णमूर्ती आयोगाने केंद्र सरकारला ओबीसींचा इम्पिरिकल डाटा तयार करणे बाबत आदेश दिले होते त्यानुसार तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह सरकारने क रोडो रूपये खर्च करून इम्पिरीकल डाटा तयार केला होता परंतु २०१४ ला सरकार बदलले मो दि सरकार सत्तेवर आले भाजपा सरकारने रोहिणी आयोगाला ओबीसी च्या मानेवर सुरा ठेवणारा डाटा दिला पण कोर्टाला आवश्यक असणारा इंपिरिकल डाटा दिलाच नाही उलट तेच सत्तेत असणारे भाजपा नेते मंडळींनी रस्त्यांवर उतरून आंदोलन सुरू करून दुटप्पी भूमिका घेत आहेत या भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करून जो पर्यंत ओबीसी आरक्षण
मिळत नाही तो पर्यंत निवडणुका घेवू नका अशी मागणी जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागांचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदन दिले आहे
निवेदनावर विजयकुमार साबदे, प्रा सुधीर पोतदार, पद्माकर वाघमारे, तानाजी फुटाणे, शिवाजी पन्हाळे, गोविंद कोंबडे, ज्ञानोबा गवले, बालाजी मनदुमले, रंगनाथ घोडके, जालिंदर बर्डे, नवनाथ मुंढे, अशोक पांचाळ, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.