डॉ बाबासाहेब आंबेडकर विचाराने अजरामर झाले
- ॲड जयराज जाधव
औसा-भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान देऊन आणि भारतीय राज्यघटना लिहून खंडप्राय भारत देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही रुजून मानवं जातीला सर्व स्तरातील जनतेला सामाजिक शैक्षणिक राजकीय व आर्थिक क्षेत्रात सहभागी करून घेण्याचे लोककल्याणकारी कार्य केले.
त्यांच्या विचारांमुळे भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अजरामर झाले असे प्रतिपादन अँड जयराज जाधव यांनी केले नागरसोगा तालुका औसा येथे दिनांक 6 डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत संबोधित करताना ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा प सदस्य भास्कर सूर्यवंशी हे होते.
प्रमुख पाहुणे सूर्यवंशी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाराम अडसुळे यांनी केले तर सागर अडसुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वश्री सिद्धार्थ आडसुळे किरण कांबळे रमेश अडसुळे कैलास अडसुळे अंजली अडसुळे शरद अडसुळे आणि परिश्रम घेतले कार्यक्रमास नागरसोगा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.