आपण पाहात आहोत महाराष्ट्र रिपोर्टर न्यूज़
बातमी औसा हुन मुख़्तार मणियार यांच्या कडू
उमरभाई पंजेशा युवा मंचचे कौतुकास्पद उपक्रम
औसा शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील मोमीन गल्ली मशीदी समोर नागरिकांच्या सोयीसाठी आपल्या प्रभागात कोव्हीड लसीकरण माझा प्रभाग-माझं शहर-माजी जबाबदारी या अनुषंगाने आज दिनांक 6 डिसेंबर 2021 सोमवार रोजी कोविड लसीकरण शिबिर घेण्यात आले.या शिबीरामध्ये ज्यांनी नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतलेला नाही त्यांनी आजच त्वरित लसिकरण करून घ्यावे असे आवाहन उमरभाई पंजेशा युवा मंचच्या वतीने करण्यात आले. शिबिराची सुरुवात.मोमीन समाजाचे.हाजी चांदसाब बरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी या शिबिरामध्ये औसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीकारी डॉक्टर अंगद जाधव, यांच्या टिम ने येऊन या शिबिराला भेट देऊन पाहणी केली.यावेळीऔसा ग्रामिण रुग्णालयचे कर्मचारी शितल वांगे,सागर, विलास शिंदे, अतुल कांबळे,भिमाशंकर स्वामी यांनी कोविड लसीकरणासाठी सहकार्य केले.यावेळी शिबिरामध्ये कोविड लसीकरणाचा पहीला व दुसरा डोस असे एकूण 156 नागरिकांनी लाभ घेतला.या शिबीराला चांगला प्रतिसाद मिळाला या शिबिरामध्ये औसा नगरपालिकेचे स्वच्छता सभापती मेहराज शेख यांनी या शिबिरामध्ये कोविड लसीकरण घेणा-यांना मोफत मास्क व गोळया वाटप केले.या शिबीरामध्ये सुलेमान शेख वकील इनामदार ,जफर शेख,मिनाहाज पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.या शिबीराला यशस्वी करण्यासाठी उमर भाई पंजेशा युवा मंचचे अनवर करपुडे,आरेफ मणियारी,एकबाल करपुडे,यासीन करपुडे,हांजी करपुडे,आसीफ करपुडे,अजीम अलुरे,अखील कुमारकीरी,शबतुल्ला बासले,जिलानी हिप्परगे,चांदपाशा मणियारी, पत्रकार नदीम सय्यद, आदिनी परिश्रम घेतले.
आमच्या महाराष्ट्र रिपोर्टर चैनल ला सब्सक्राइब लाइक शेयर करा
महाराष्ट्र रिपोर्टर च्या रिपोर्टर कैलेंडर 2022 मधे जाहिरात साठी संपर्क करा संपादक मज़हरोद्दीन पटेल 9975640170
महाराष्ट्र च्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रतिनिधी नियुक्त करने आहे अर्ज करा संपर्क कार्यालय मस्जिद उमर फारुख समोर कालन गली औसा व्हाट्सअप नंबर वर sms करा 9975640170
ईमेल Laturreporter2012@gmail.com जे आपल्या स्क्रीन वर आलेला आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.